Shukra Gochar on 15 September: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही काळाने आपली रास बदलतो. धन व संपत्तीचा कारक शुक्र १५ सप्टेंबरला सिंह राशीत प्रवेश करेल आणि ९ ऑक्टोबरला पुन्हा रास बदलेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या सिंह राशीत शुक्राचं गोचर काही राशींकरिता खूप शुभ ठरेल.

ज्योतिष गणनेनुसार, शुक्राच्या या बदलामुळे काही भाग्यवान राशींना आर्थिक लाभ व करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच व्यापारात वाढ होऊ शकते. नशिबाने कामात यश मिळेल. चला तर मग पाहूया, शुक्राच्या गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर शुभ आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही भौतिक सुखांचा आनंद घेऊ शकता. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिरता मिळेल. जीवनातील अडचणी दूर होतील. धर्म-कर्मात सहभागी व्हाल. शुभ बातम्या मिळू शकतात.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचा गोचर शुभ आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जे काही तुम्ही करायचे ठरवाल, त्यात तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा भूमिका मिळू शकतात. पैसा येईल आणि संपत्ती वाढेल.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर अनुकूल आहे. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. भौतिक सुख-संपत्ती वाढेल. प्रवासातून फायदा होईल. नशिबाने काही कामं पूर्ण होतील. अचानक पैसा मिळू शकतो. अडकेलेली कामे यशस्वी होतील.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचा गोचर फायदेशीर ठरू शकतो. शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला पैसा मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सामाजिक मान-प्रतिष्ठा वाढेल. जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवता येईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)