Shukra Gochar in 21 August: वैदिक पंचांगानुसार यंदा जन्माष्टमीचा सण १६ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रह आपली चाल बदलणार आहे.
२१ ऑगस्टला शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. मात्र ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे गोचर शुभ ठरू शकतं. या राशींना शुक्र देवाच्या कृपेने भरपूर धन-दौलत मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. संतानाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
तूळ राशी (Libra Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचं गोचर सकारात्मक ठरू शकतं. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी संचार करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळू शकते. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती मिळू शकते. ऑफिसमध्ये सीनियर आणि ज्यूनियर यांचं चांगला सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल अधिक गंभीर व्हाल. तसेच व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. वडिलांशी संबंधही अधिक चांगले होतील.
कर्क राशी (Cancer Horoscope)
शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण हे गोचर तुमच्या राशीपासून लग्न भावात होणार आहे. तसेच शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या चौथ्या आणि अकराव्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. तुम्ही एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. रोजच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात चमक येईल. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहितांसाठी नवीन लग्नाच्या प्रस्तावाचा योग आहे. व्यापाऱ्यांना मोठ्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या धन भावात संचार करणार आहेत. तसेच ते तुमच्या गोचर कुंडलीत पाचव्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला मुलांबद्दल एखादी आनंदाची बातमी मिळू शकते – जसं की मुलाला नोकरी लागणं किंवा लग्न ठरणं. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल आणि एखाद्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. विवाहित लोकांच्या प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जे अजून सिंगल आहेत, त्यांना एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.