Shukra Gochar on 3 September: धन, यश देणारे शुक्र ग्रह सप्टेंबरमध्ये महत्त्वाचं गोचर करणार आहेत. हे गोचर ५ राशींच्या लोकांना खूप पैसा आणि आनंद देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, शुक्र ग्रहामुळे कोणत्या राशींचे नशिब उजळणार आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सर्वात शुभ ग्रह मानले जाते. कारण शुक्र ग्रह धन, ऐश्‍वर्य, प्रेम यांचा कारक आहे. हा ग्रह माणसाला भौतिक सुख देतो. ३ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रह गोचर करून अश्‍लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राचा हा नक्षत्र बदल ५ राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना शुक्राचा नक्षत्र गोचर पैसे कमावण्याच्या नव्या संधी देईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल व्यक्तिमत्त्वात खास चमक आणेल. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आयुष्यात प्रेम वाढेल. पैसा, सुख-समृद्धी वाढेल. कला क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना शुक्र गोचर अचानक धनलाभ देऊ शकतो. जे लोक नवं घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत होते त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्राचं नक्षत्र गोचर भाग्याची साथ देईल. तुमची प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. व्यवसायात वाढ होईल. प्रवासाला जाऊ शकता. धनलाभ होईल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना शुक्राचा अश्‍लेषा नक्षत्रात प्रवेश अनेक बाबतीत चांगले परिणाम देईल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल. जे लोक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात, त्यांचा व्यवसाय वाढेल. फक्त घाईघाईत निर्णय घेऊ नका. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)