Shukra-Guru Yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. येत्या ५ जून रोजी शुक्र आणि गुरू ग्रह एकमेकांपासून ६० डिग्री अंतरावर असतील. ज्यामुळे हे दोन्ही ग्रह विशेष योग निर्माण करतील. या योगाला लाभ योग किंवा लाभ दृष्टी योगदेखील म्हटले जाते. ज्याचा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो.

‘या’ तीन राशींना शुक्र-गुरू देणार पदोपदी यश

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप फायदेशीर ठरेल. या योगाच्या प्रभावाने तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुरूच्या सानिध्यात राहिल्यास गुरूचा आर्शीवाद प्राप्त होईल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींना हा योग भाग्यकारी ठरेल. हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)