Dhan Shakti Rajyog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह आपली गती वेळोवेळी बदलतात. अनेकदा ग्रहांच्या या बदलामुळे शुभ आणि फायदेशीर योग तयार होतात. नोव्हेंबर महिन्यात शुक्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे धनशक्ती योग बनेल, जो ३ राशींसाठी खूप भाग्यशाली आणि लाभदायक ठरेल.
नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रहाचे गोचर महत्वाचे
वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्राला दैत्यांचा गुरु म्हटले आहे. हा ग्रह सुख, प्रेम, कला, ऐश्वर्य आणि वैवाहिक जीवन यांचा कारक मानला जातो. साधारणपणे २६ दिवसांनी शुक्र राशी बदलतो. नोव्हेंबर २०२५ मध्ये शुक्राचा गोचर वृश्चिक राशीत होणार आहे. त्याच वेळी मंगळ आधीपासूनच या राशीत असतील, त्यामुळे दोन्ही ग्रहांची युती होऊन धनशक्ती राजयोग तयार होईल. हा शुभ योग २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रभावी राहील आणि याचा परिणाम सर्व १२ राशींवर काही ना काही प्रकारे दिसून येईल. आता पाहू या कोणत्या राशींसाठी हा शुभ योग विशेष फलदायी ठरू शकतो.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या सप्तम भावात ही युती होत आहे, जी व्यापार आणि वैवाहिक जीवनासाठी खूप शुभ आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. भागीदारी किंवा नवीन गुंतवणुकीतून विस्ताराची संधी मिळेल. दांपत्य जीवनात सामंजस्य वाढेल आणि अडचणी संपतील. अविवाहितांसाठी विवाहाचे योग प्रबळ होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समृद्धी वाढेल.
सिंह राशी (Leo Horoscope)
या राशीच्या चतुर्थ भावात शुक्र आणि मंगळाची युती होत आहे, ज्यामुळे भौतिक सुख-समृद्धी मिळण्याचे योग तयार होत आहेत. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. करिअरमध्ये नवी दिशा मिळण्याची संधी मिळेल. व्यापारात लाभ होईल आणि गुंतवणूक करणे शुभ ठरेल. आरोग्य सामान्य राहील आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. प्रेमजीवनात आनंद वाढेल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
तृतीय भावात होणारी शुक्र-मंगळ युती कन्या राशीच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी संधी देईल. परदेश प्रवास किंवा नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. व्यापारात नफा आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग दिसतील. आत्मविश्वास वाढेल आणि योजना यशस्वी होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)