Shukra Chitra Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे व्यक्तीच्या कुंडलीत विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, सौंदर्य, आकर्षण, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते, त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो असे लोक आयुष्यात या सर्व गोष्टी सहज प्राप्त करतात. दरम्यान, इतर ग्रहांप्रमाणे शुक्र देखील ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो.
पंचांगानुसार, शुक्र २८ ऑक्टोबर २०२५ पहाटे ५ वाजून १७ मिनिटांनी हस्त नक्षत्रातून चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. चंद्राचे नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल.
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींचे नशीब चमकवणार
वृषभ (Vrushabh Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल.
तूळ (Tula Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अविवाहितांचे लग्न ठरेल. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
