Shukra Nakshatra Parivartan 2025:  शुक्र (Venus) ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सुंदरता, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार संपत्ती, समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. याशिवाय त्याचं नक्षत्रही काही काळानंतर बदलतं. यावेळी शुक्र मीन राशीमध्ये स्थित आहे. येत्या १६ मे रोजी शुक्र रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्रामध्ये तो ३१ मेपर्यंत राहील. बुध नक्षत्रामध्ये शुक्र ग्रह आल्याने काही राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो. शुक्र नक्षत्र बदलल्यानंतर काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. चला जाणून घेऊया, या कोणत्या राशी आहेत.

‘या’ राशींचं नशीब चमकणार?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन शुभ वार्ता घेऊन येणारं ठरू शकतं. या राशीचे काही लोक या काळात रिअल इस्टेट खरेदी करू शकतात. धन संपत्तीमध्ये वाढीचा योग आहे. सोबतच नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण यामध्येदेखील फायदा होऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात प्रमोशनचा योग आहे, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते, आर्थिक स्थितीमध्येदेखील सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, सोबतच काही सकारात्मक बदलदेखील दिसून येतील.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. तसेच, या काळात तुमचे रखडलेले पैसेदेखील तुम्हाला मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन दिलासा देणारे ठरू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. प्रलंबित पैसे परत मिळतील आणि व्यवसायात अपेक्षित यशही मिळू शकते. आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. समाजात मान सन्मान वाढू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)