September Horoscope: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेव यांना आत्मविश्वास, मान-सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी आणि वडिलांचे कारक मानले जाते. तर शुक्र ग्रह हा ऐशोआराम, पैसा, वैभव, कामुकता, वैवाहिक सुख आणि श्रीमंतीचा कारक मानला जातो. असे असताना जेव्हा या दोन्ही ग्रहांचा संयोग होतो, तेव्हा या गोष्टींवर विशेष परिणाम दिसतो.
सप्टेंबर महिन्यात शुक्र आणि सूर्य युती तूळ राशीत होत आहे. त्यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीची संधी मिळू शकते. चला तर मग बघूया, कोणत्या राशींसाठी हा योग शुभ ठरणार आहे…
कर्क राशी (Cancer Horoscope)
तुमच्यासाठी शुक्रादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापारात नवे विचार अमलात आणण्यासाठी हा योग्य काळ आहे. या काळात तुम्ही काहीतरी लक्झरी वस्तूही खरेदी करू शकता. तसेच आईच्या माध्यमातून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
शुक्रादित्य राजयोगामुळे धनु राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापारात नवे विचार आणण्यासाठी हा चांगला काळ आहे. बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल. या काळात केलेल्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
तुमच्यासाठी शुक्रादित्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची वाणी प्रभावशाली बनेल, ज्यामुळे व्यवहार आणि बोलचालीत यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीचे नवे मार्ग मिळतील. कुटुंबातील नाते संबंध अधिक घट्ट होतील. तसेच या काळात तुम्ही पैसा साठवण्यातही यशस्वी ठराल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)