Chaturanshati Yog November 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी बुध आणि शुक्र एकमेकांपासून ४० ड्रिगी या कोणीय स्थितीत राहतील. या दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे ‘चत्वारिंशती योग’ निर्माण होईल. हा योग व्यक्तीच्या आयुष्यातील संकटं पार करण्यासाठी मदत करतो. १२ राशीपैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच हा लाभदायक सिद्ध होईल.

‘या’ चार राशींवर असणार बुध-शुक्राची कृपा

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप उत्तम होईल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या लोकांसाठीही ‘चत्वारिंशती योग’ खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीसाठी हा योग खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)