Surya Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, १९ नोव्हेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण ग्रहांचा राजा सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास, नेतृत्त्व, प्रकाश; तर शनी म्हणजे संयम, कर्तव्य, संघर्ष आणि वास्तवाचा धडा. या दोन्ही पूर्णपणे भिन्न ऊर्जांचा संगम जेव्हा एका नक्षत्रात होतो, तेव्हा जीवनातील अनेक स्तरांवर सूक्ष्म पण प्रभावी घडामोडी घडू शकतात, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.

या दिवशी सूर्य विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार असून २ डिसेंबरपर्यंत सूर्य याच नक्षत्रात भ्रमण करणार आहे. अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनी मानला जातो. सूर्य आणि शनी या दोन ग्रहांच्या ऊर्जा वैशिष्ट्याने विरोधी असणारा संगम काहींना स्थिरता, काहींना प्रगती तर काहींना दीर्घकाळ अडकलेले काम पुढे नेण्याची संधी देऊ शकतो, अशी श्रद्धा आहे.

या काळात परिश्रमांचं फळं मिळण्याची गती वाढू शकते, निर्णयक्षमता सुधारू शकते आणि दीर्घ काळापासून अस्थिर असलेल्या गोष्टींना नवी दिशा मिळू शकते, असा ज्योतिषीय अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्या राशींना मिळू शकतात शुभ संकेत?

सूर्याच्या नक्षत्र बदलानं ‘या’ राशींचं नशिब उजळणार?

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाचा मिथुन राशीवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसते. करिअरमध्ये एखादी नवी सुरुवात होऊ शकते. जुन्या, अडकलेल्या कामांना वेग मिळू शकतो. वरिष्ठ व्यक्तींचे सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्याचा अनुभव येऊ शकतो. आर्थिक घडामोडींनाही स्थैर्य मिळण्याची चिन्हे ज्योतिषीयदृष्ट्या दिसतात. जुने वाद किंवा गैरसमज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.

सिंह

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी, त्यामुळे सूर्याचे नक्षत्र परिवर्तन ही राशी अनेकदा विशेषत्वाने अनुभवते अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीसाठी हे दिवस लाभदायी ठरू शकतात. व्यवसायात फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात नवी जबाबदारी किंवा ओळख मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश देणारा हा काळ आहे. कुटुंबात प्रतिष्ठा वाढण्याचे संकेतही काहींना अनुभवायला मिळू शकतात. जुना प्रयत्न यशाकडे नेण्याची शक्यता ज्योतिषीय पातळीवर दिसते.

वृश्चिक

सूर्याच्या या प्रवेशामुळे वृश्चिक राशीला अनेक पातळ्यांवर लाभदायी परिस्थिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आर्थिक लाभाचे संकेत दिसत आहेत. दूरदृष्टी उपयोगात येऊन मोठ्या योजनांवर काम करण्याची संधी मिळू शकते. सामाजिक व वैवाहिक नात्यांमध्ये सौहार्द वाढण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभ होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, अशी ज्योतिषीय गणना सूचित करते.

१९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात सूर्याचे शनीच्या नक्षत्रातील भ्रमण काही राशींना प्रगती, स्थैर्य आणि नवीन संधी देऊ शकते, अशी ज्योतिषीय शक्यता वर्तवली जाते. मात्र, हे परिणाम व्यक्तीच्या कुंडलीनुसार बदलू शकतात, याची जाण ठेवल्यास उत्तम.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)