Sun Planet Transit 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी बदलत असतो आणि या राशी बदलाचा परिणाम थेट मनुष्यावर होतो. ग्रहांचा राजा सूर्याने १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला आणि इथे १४ मे पर्यंत राहणार आहे. त्यामुळे सूर्य देवाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी हे राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी…

मिथुन: सूर्यदेवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्यदेव तुमच्या ११ व्या भावात प्रवेश करत आहेत. ज्याला उत्पन्नाचे ठिकाण म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. तसंच नवीन व्यावसायिक संबंध तयार होऊ शकतात. ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. तुम्ही व्यवसायात नवीन सौदे करू शकता. तसंच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. दुसरीकडे मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि सूर्य ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. तसंच तुमच्या गोचर कुंडलीत सूर्य देवाचे स्थान काय आहे? हे येथे पाहण्यासारखे आहे.

कर्क: सूर्य देव तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करत आहे. ज्याला नोकरी आणि कार्यक्षेत्राचे भाव ओळखले जातात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुमचे इंक्रीमेंट आणि अप्रॅजल होऊ शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. यासोबतच या काळात तुमची काम करण्याची स्टाईलही सुधारू शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. त्याचबरोबर वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. कर्क राशीवर चंद्र ग्रहाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र देव आणि सूर्य ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या जन्मपत्रिकेत सूर्यदेव कोणत्या स्थितीत बसला आहे आणि त्याचा चंद्र ग्रहाशी काय संबंध आहे हे येथे पाहण्यासारखे आहे.

आणखी वाचा : Garun Puran: या ५ गोष्टी आयुष्यात केल्याने आयुष्य कमी होतं, असं गरुड पुराणात सांगण्यात आलंय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन: सूर्यदेवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण सूर्यदेवाचे तुमच्या द्वितीय स्थानात संक्रमण झाले आहे. ज्याला पैशाचे आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसंच या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. दुसरीकडे, ज्यांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांच्यासाठीही हा काळ चांगला जाणार आहे. त्याचबरोबर वाहन आणि जमीन, मालमत्ता यांच्या खरेदी-विक्रीसाठी काळ चांगला आहे. याच्या मदतीने तुम्ही राजकारणात यश मिळवू शकता आणि कोणतेही पद मिळवू शकता. तसंच मीन राशीच्या लोकांवर लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. एकंदरीत सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. इथे तुमच्या कुंडलीत सूर्यदेव अशुभ आहे की शुभ आहे हे पाहणं आवश्यक आहे.