Sun Transit 2025: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी बदलतात, ज्याचा प्रभाव माणसाच्या आयुष्यावर आणि देश-दुनियेवर दिसतो. अशातच २० जुलैच्या रात्री सूर्यदेव पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पुष्य नक्षत्रावर शनीदेवाचे अधिपत्य आहे. अशा वेळी सूर्यदेव पुष्य नक्षत्रात गेल्यामुळे काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांना भाग्याची साथ आणि पद-प्रतिष्ठा मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी…

कन्या राशी (Virgo Horoscope 21 July)

सूर्यदेवांचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे या काळात तुम्हाला कामधंद्यात प्रगती होऊ शकते. जर तुम्ही मीडिया, कम्युनिकेशन, मार्केटिंग किंवा शिक्षण क्षेत्रात काम करत असाल, तर तुम्हाला चांगला फायदा होईल. या काळात धन मिळवण्याच्य नवीन संधी मिळतील. नोकरीत प्रमोशन किंवा पगार वाढ होऊ शकतो. संगीत, कला किंवा सर्जनशील कामांमध्ये तुमची रुची वाढेल, आणि कुटुंबात शुभकार्य होतील. तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra Horoscope 21 July)

सूर्यदेवांचा नक्षत्र बदल तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फायद्याचा ठरू शकतो. या काळात स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि कुटुंबात शुभकार्य होऊ शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तसेच तुमचं धैर्य आणि पराक्रम देखील वाढू शकतो.

कर्क राशी (Cancer Horoscope 21 July)

तुमच्यासाठी सूर्यदेवांचा नक्षत्र बदल सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसेच नव्या स्रोतांमधून तुम्ही पैसे कमावू शकता. या वेळी वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे शुभ योग निर्माण होत आहेत. गुंतवणुकीतूनही फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल आणि करिअरमध्ये नवीन यश मिळेल. तसेच तुमच्या योजना यशस्वी होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)