Hanuman Jayanti 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या राशी परिवर्तनाला ज्योतिषात अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात सूर्यदेव एकदा राशी परिवर्तन करतात, सूर्य ज्या राशीत प्रवेश करणार त्यानुसार त्या महिन्यातील संक्रांत ठरत असते. १५ मार्चला सूर्याने मीन राशीत प्रवेश घेतला होता तर आता १४ एप्रिलपर्यंत सूर्यदेव मीन राशीतच स्थित असणार आहेत. तर १४ एप्रिलपासून सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत अगोदरच बुध व शुक्र स्थिर आहेत तर २२ एप्रिलला गुरु देव सुद्धा मेष राशीत प्रवेश घेणार आहे. येत्या ६ तारखेला म्हणजेच हनुमान जयंतीला सूर्य देव भ्रमण स्थितीत येऊ लागतील व त्यानंतर ८ दिवसांनी ते मेष राशीत प्रवेश घेतील. याचा अर्थ हनुमान जयंतीपासूनच काही राशींच्या नशिबात उलाढाली सुरु होणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार चार अशा राशी आहेत ज्यांचे नशीब हनुमान जयंतीपासून जोर धरू शकेल. या राशींना नेमका कसा लाभ होणार हे पाहूया…

हनुमान जयंतीपासून ‘या’ राशीच्या नशिबाला मिळेल बळ?

मेष रास (Mesh Rashi)

सूर्याचे मेष राशीत गोचर होताच तुमचा आत्मविश्वास वाढीस लागू शकतो. या काळात नोकरदार मंडळींना पदोन्नत्तीचा योग आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभू शकेल.

मिथुन रास (Mithun Rashi)

सूर्य गोचर मिथुन राशीसाठी लाभदायक संधी घेऊन येऊ शकतात. या काळात आपल्याला आर्थिक अडचणीतून मार्ग काढता येईल. तुम्हाला मातृरुपी धनलाभाचे योग आहे.

सिंह रास (Sinha Rashi)

सिंह राशीचे स्वामी सूर्य देव आहेत त्यामुळे कोणत्याही राशीत असताना सिंह राशीला लाभ होऊ शकतो. मेष व सिंह या एकमेकांना साजेश्या राशी आहेत त्यामुळे १४ एप्रिलला होणारे गोचर सिंह राशीला सुद्धा लाभदायक ठरू शकते. येत्या काळात तुम्हाला विवाहाचे योग आहेत.

हे ही वाचा<< ७२ तासांनी ‘या’ राशींच्या नशीबाचे दार उघडणार? ‘लक्ष्मी योग’ बनल्याने मिळू शकते अमाप धनलाभ व श्रीमंती

वृश्चिक रास (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या मंडळींना कुटुंबात एखादी गोड बातमी समजू शकतेआर्थिक स्थिती भक्कम झाल्याने तुमच्या मनावर ताण राहणार नाही. नशीब व कुटुंबाची साथ लाभू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)