Sun and Venus Planet Conjunction in Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्याच वेळी, जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तसेच ३१ ऑगस्टला शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे सिंह राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. त्याच वेळी, अशा ३ राशी आहेत ज्यांना यावेळी विशेष धन मिळू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल…

वृश्चिक राशी

शुक्र आणि सूर्य ग्रहाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण या ग्रहांचा संयोग तुमच्या पारगमन कुंडलीतून दहाव्या घरात तयार होणार आहे. जे काम आणि नोकरीचे ठिकाण मानण्यात येते. त्यामुळे, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता दिसतेय. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याची देखील शक्यता आहे. त्याच वेळी, आपण आपल्या कामात सुधारणा पाहू शकता. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. यावेळी, तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

( हे ही वाचा: २६ ऑक्टोबरपर्यंत बुध कन्या राशीत विराजमान राहील; ‘या’ ३ राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता)

कर्क राशी

शुक्र आणि सिंह राशीचा योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीशी दुसऱ्या स्थानी तयार होत आहे. जे धन आणि वाणीचे घर मानण्यात येते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसतेय. तसेच या काळात तुम्हाला व्यवसायात चांगल्या ऑर्डर येऊ शकतात. तर ज्या लोकांची कारकीर्द भाषण क्षेत्राशी संबंधित आहे. उदाहरणार्थ फिल्म लाइन, मीडिया, शिक्षक किंवा मार्केटिंग तर ही वेळ त्यांच्यासाठी उत्तम ठरू शकते.

कन्या राशी

तुमच्या राशीतून अकराव्या भावात शुक्र आणि सूर्याचा संयोग तयार होत आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढण्याची शक्यता दिसतेय. तसेच, यावेळी तुम्ही अनेक माध्यमातून पैसे कमवू शकाल. त्याच वेळी, व्यवसायात एक महत्त्वाचा करार निश्चित केला जाण्याची संभावना दिसतेय. यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळू शकतात. यावेळी तुम्हाला कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते.