Surya and Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे कोणत्याना कोणत्या ग्रहाबरोबर त्याची युती निर्माण होते. जेव्हा सूर्याची शुक्राबरोबर युती निर्माण होते, तेव्हा ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होतो.

पंचांगानुसार, ०२ नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार असून याच राशीत सूर्याने १७ ऑक्टोबर रोजी प्रवेश केला होता. ज्यामुळे तूळ राशीत शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

‘शुक्रादित्य राजयोग’ देणार धनलाभ घडवणार

वृषभ (Vrushabh Rashi)

शुक्रादित्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.

कर्क (Singh Rashi)

सूर्य आणि शुक्राच्या युतीच्या प्रभावाने कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्यही चांगले राहिल.

तूळ (Tula Rashi)

शुक्रादित्य राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.

(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)