Surya dev lucky rashi: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देवाच्या काही राशी आहेत, ज्यांच्यावर तो नेहमीच आशीर्वाद ठेवून असतो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला छठ पूजेचा सण सुरू होतो. हा साधारणपणे बिहार भागात साजरा केला जातो. या वर्षी २५ ऑक्टोबरपासून तो सुरू झाला आहे. या सणाला महिला सूर्य देव आणि छठीमैय्या यांची पूजा करतात. या तिथीला केवळ छठ पूजेमुळेच नाही, तर इतर कारणांमुळेही महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा राशींबद्दल ज्या सूर्य देवाला सर्वात जास्त प्रिय आहेत आणि ज्यांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल.
मेष राशी
मेष राशीला सूर्याची सर्वात श्रेष्ठ राशी मानले जाते. म्हणूनच सूर्य देव या राशीवर विशेष आशीर्वाद देत असतात. या राशीचे लोक धाडसी, प्रामाणिक आणि उत्साहाने भरपूर असतात. जेव्हा सूर्य बलवान असतो, तेव्हा हे लोक नेतृत्वगुण प्रदर्शित करतात. तसंच स्वत:ला स्थिरस्थावर करतात. ते त्यांच्या कारकिर्दीत वेगाने प्रगती करतात. हे लोक कोणतेही काम सुरू करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, मात्र कधीकधी रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात. दररोज सकाळी सूर्याची प्रार्थना करून ते त्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवू शकतात.
सिंह राशी
सूर्य देवासाठी सर्वा खास राशी म्हणजे सिंह राशी. कारण ती सूर्याचीच राशी आहे. या राशीचे लोक आत्मविश्वासू, उत्साही आणि नेतृत्वगुण असलेले असतात. ते कुठेही जातात तरी ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सूर्याच्या कृपेमुळे त्यांना लवकर आदर आणि स्थान मिळते. ते त्यांच्या कारकिर्दीत नेते असतात. त्यांचे व्यक्तिमत्व मजबूत आणि आत्मविश्वासू असते. जर सूर्याचा प्रभाव कमी झाला तर त्यांना थकवा जाणवतो. म्हणून सिंह राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्यनमस्कार करण्याची आणि सूर्याला पाणी अर्पण करण्याची सवय लावावी.
धनु राशी
धनु राशीवर सूर्य देवाचा विशेष प्रभाव असल्याचे मानले जाते. कारण ती अग्नि राशी आहे. या राशीचे लोक सत्यवादी, धार्मिक आणि उत्साही असतात. सूर्याच्या कृपेमुळे त्यांचे नशीब आयुष्यात अनेकदा साथ देते. ते शिक्षण, लेखन, प्रशासन किंवा परदेशाशी संबंधित नोकऱ्यांमध्ये यश मिळवतात. त्यांचा आत्मविश्वास त्यांना वेगळे ठरवतो. जेव्हा सूर्य बलवान असतो तेव्हा धनु राशीच्या लोकांना अचानक प्रसिद्धी, नाव आणि संधी मिळतात. असं असताना जर सूर्य कमकुवत असेल तर त्यांना आत्मविश्वासाचा अभाव आणि दिशाहीनता जाणवू शकते.
सूर्य देवाचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला सर्व ग्रहांचा राजा आणि पिता मानले जाते. त्याला शक्ती, आत्मविश्वास आणि यशाचा देव मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो ते आत्मविश्वासू आणि जीवनात आदरणीय असतात. काही राशींना सूर्याची विशेष कृपा लाभते आणि त्या व्यक्ती आयुष्यात भाग्यवान ठरतात.
