Surya Gochar 2024 : १५ मार्च २०२४ ला सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि १३ एप्रिल पर्यंत विराजमान राहणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे राहू बरोबर युती झालेली दिसून येईल तर कहाही दोष सुद्धा निर्माण होईल. सूर्याने मीन राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल, चला तर जाणून घेऊ या.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खर्च वाढू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. मार्च महिन्यात या राशीचे लोकांना अनेक गोष्टी विसरण्याची समस्या जाणवेल.

वृषभ

सूर्य देवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना अचानक लाभ मिळू शकतो.प्रमोशनची वाट पाहणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते.

मिथुन

या राशीच्या लोकांना कामाच्या बाबतीत सतर्क राहायला पाहिजे. वरिष्ठ लोकं तुमच्या कार्यांवर लक्ष ठेऊ शकतात. सूर्य नमस्कार केल्याने आरोग्याच्या दृष्टीने या लोकांना लाभ मिळू शकतो.

कर्क

कुटूंबामध्ये आनंदाची बातमी मिळेल. या राशीचे लोक या कालावधीत पूजा करू शकता.

हेही वाचा : Dream Astrology : स्वप्नात उंचावर चढताना स्वत:ला पाहिले का? जाणून घ्या, या स्वप्नाचा अर्थ…

सिंह

सिंह राशीच्या लोकांनी लहान कार्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. या काळात अशा लोकांबरोबरो यांची भेट होईल जे त्यांना वाईट मार्गावर नेऊ शकतात. त्यामुळे सकारात्मक राहणे, गरजेचे आहे.

कन्या

ऑफिस असो किंवा घरी जोडीदाराबरोबर समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराचे आरोग्य जपावे. जोडीदार आणि तुमच्यामध्ये दूरावा निर्माण होऊ शकतो.

तुळ

या काळात जर या राशीच्या लोकांना खूप जास्त राग येत असेल तर शांत राहणे, चांगले आहे. मार्च महिन्याच्या शेवट ते १५ एप्रिलपर्यंत संक्रमणांपासून दूर राहा.

वृश्चिक

सूर्याचे राशीपरिवर्तन कुटूंबाच्या बाबतीत या लोकांना समस्या निर्माण करतील. एक महिना असे कोणतेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

धनु

नोकरी बदलण्याची इच्ठा असणाऱ्या या राशीच्या लोकांनी एक महिना याबाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे.

मकर

या राशीच्या लोकांसाठी सूर्य तिसऱ्या स्थानावर जात आहे. अशावेळी नेटवर्क आणखी भक्कम करण्यासाठी लक्ष द्यावे. कोणत्याही वादविवादात पडणे टाळावे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी ध्यान करावे. या वेळी कोणतेही नकारात्मक विचार मानसिक ताण तणाव निर्माण करू शकतात.

मीन

सरकारी कामांना पूर्ण करण्याची वाट पाहणाऱ्या या राशीच्या लोकांनी मार्च महिन्यात सर्व कामे पूर्ण करावीत. सूर्यदेवाची या राशीच्या लोकांवर कृपा दिसून येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)