Sun Transit In Leo 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्याला आपण गोचर म्हणतो. ग्रहांच्या गोचरमुळे राशिचक्रातील १२ राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. आता सूर्यदेव राशी परिवर्तन करून ऑगस्टमध्ये आपल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे काही राशींवर शुभ प्रभाव पडू शकतो. जाणून घेऊ या कोणत्या राशींवर सूर्याची कृपा दिसून येईल. सूर्य देव प्रत्येक महिन्याला एका राशीतून बाहेर पडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सूर्य त्याच्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये १२ महिन्यानंतर प्रवेश करणार आहे.
सूर्याचे स्वराशीमध्ये प्रवेश
सूर्य हा स्वराशी सिंह मध्ये प्रवेश करत असल्याने तीन राशीच्या लोकांना त्यांचा फायदा होऊ शकतो. या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. या नशीबवान राशींना अपार यश मिळू शकते. या लोकांना धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. जाणून घेऊ या सूर्याचे सिंह राशीमध्ये गोचर कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर फायद्याचे ठरणार आहे. या लोकांना शुभ वार्ता ऐकायला मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. कार्यस्थळी या लोकांच्या कामावर वरिष्ठ खूश होईन. प्रगतीचे मार्ग उघडतील. धार्मिक कार्यात सहभाग घेईल. कमाईचे नवीन मार्ग मिळतील.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे सिंह राशीमध्ये गोचर अत्यंक शुभ ठरू शकते. या लोकांच्या भौतिक सुखामध्ये वृद्धी होईल. जमीन, घर आणि वाहन खरेदी करण्याचे योग जुळून येत आहे. करिअरमध्ये यश मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारणार. अडकलेले कार्य पूर्ण होईल. आईवडीलांबरोबरचे संबंध आणखी दृढ होईल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. काही लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. करिअरच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये मेहनतीचे फळ मिळेन. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)