Sun Transit in 17 September: सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. तो दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. सप्टेंबर महिन्यात सूर्य सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. हा बदल १७ सप्टेंबरला रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी होईल आणि १६ ऑक्टोबरपर्यंत सूर्य कन्या राशीत राहील.
कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. सूर्याचं हे गोचर सर्व १२ राशींवर परिणाम करेल. काही राशींना चांगले फळ मिळेल तर काहींवर वाईट परिणाम होईल. ज्योतिषानुसार मिथुनसह तीन राशींना या बदलाचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हे गोचर भाग्यवान ठरणार आहे.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना सूर्याच्या गोचरामुळे चांगले फळ मिळेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत व्हाल. प्रेमसंबंध आधीपेक्षा चांगले होतील.
तूळ राशी (Libra Horoscope )
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं गोचर चांगलं ठरेल. या काळात तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची संधी मिळेल. नोकरीसाठी चांगले आणि नवे प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात नफा वाढेल. जोडीदारासोबत चांगला संवाद होईल. जीवनात आनंद येईल. एखाद्या शुभ बातमीमुळे मन प्रसन्न राहील.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरेल. या काळात कामांमध्ये यश मिळेल. एखादे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ फायदेशीर ठरेल. धनलाभ होईल आणि तुम्ही बचतही करू शकाल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)