Surya Gochar Shani Vakra Drishti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करीत इतर ग्रहांवर त्यांची वक्री दृष्टी टाकतात. त्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. यात १५ मे २०२५ रोजी सूर्य गोचर करणार आहे. सूर्य सध्या मेष राशीत आहे आणि १५ मे रोजी तो वृषभ राशीत गोचर करेल. सूर्य वृषभ राशीत गोचर करताच मीन राशीत स्थित शनीची सूर्यावर तिसरी वक्र दृष्टी पडेल, ज्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. नेमक्या कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ…

मेष (Aries)

शनिदेवाची वक्री मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनात सुखसोई वाढतील, कामाच्या ठिकाणी आदर मिळेल आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.

कर्क (Cancer)

सूर्यावर पडणारी शनीची वक्र दृष्टी कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशात प्रवास करण्याची किंवा परदेशातून लाभ मिळण्याची शक्यतादेखील आहे. मानसिक शांती आणि आध्यात्मिक विकासदेखील होईल. या काळात तुम्हाला देश-परदेशांत प्रवासाची संधी मिळेल. तसेच, तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ (Aquarius)

शनीची सूर्यावरील वक्रदृष्टी कुंभ राशीच्या लोकांना सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, मानसिक शक्ती व निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. तुमच्या जोडीदाराला प्रगती साधण्यात यश मिळू शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल.