Surya Gochar in 13 September: सप्टेंबरमध्ये सूर्यग्रहण होण्याआधीच सूर्य आपलं नक्षत्र बदलतील. सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे ४ राशींना चांगले परिणाम मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या त्या कोणत्या तीन राशी आहेत. आता सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आहेत आणि १३ सप्टेंबरला ते उत्तराफाल्गुनी नक्षत्रात जातील.

उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश

सूर्य स्वतः उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे स्वामी आहेत. सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेशामुळे कोणत्या राशींवर चांगला आणि सकारात्मक परिणाम होईल ते जाणून घेऊ या…

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा नक्षत्र प्रवेश खूप फायदेशीर ठरू शकतो. जीवनात आनंद येईल. अविवाहितांना चांगले लग्नाचे प्रस्ताव मिळतील. व्यवसायात यश मिळेल. प्रगतीची दारे उघडतील. उत्पन्न आणि आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होईल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचा नक्षत्र प्रवेश खूप चांगला ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची संधी मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. नातेसंबंध सुधारतील आणि व्यापारात मोठा फायदा होईल. चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचा नक्षत्र प्रवेश सकारात्मक बदल आणू शकतो. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. आपल्या कौशल्यावर काम करण्याची गरज आहे. व्यवसायाबाबत घेतलेल्या जुन्या निर्णयांचे चांगले फळ मिळेल. जमीन, घर किंवा गाडी खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

तूळ राशी (Libra Horoscope)

तुला राशीच्या लोकांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश समाजात मान-सन्मान देऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील आणि या काळात केलेल्या कामात यश मिळेल. लांब प्रवासाला जाऊ शकतात. उत्पन्न वाढण्याचे मार्ग मिळतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)