Surya Gochar 2024 : वैदिक पंचागनुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. या राशिपरिवर्तनाचा प्रभाव थेट आपल्या आयुष्यावर होतो. आता ग्रहांचे राजा सूर्य १ वर्षानंतर डिसेंबरमध्ये राशिपरिवर्तन करणार आहे. धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. धनु राशीवर गुरू ग्रहाचे स्वामित्व आहे. तसेच गुरू आणि सूर्य देवामध्ये मित्रतेचा भाव आहे. अशात काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या लोकांना पद, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?

धनु राशी (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे गोचर लाभदायक ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीमध्ये लग्न भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढेन तसेच या लोकांच्या आत एक नवीन ऊर्जा निर्माण होईल.तसेच अशात या लोकांना त्यांच्या सर्व कामात यश प्राप्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना या दरम्यान यश मिळणार ज्यासाठी ते खूप काळापासून मेहनत घेत आहे. तसेच विवाहित लोकांचे आयुष्य अधिक शानदार होईल. तसेच अविवाहित लोकांना विवाहाचा योग जुळून येईल.

हेही वाचा : पैसाच पैसा! दिवाळीपूर्वी बुध निर्माण करणार लक्ष्मी नारायण योग, ‘या’ तीन राशींना मिळणार अपार धनसंपत्ती अन् पैसा

सिंह राशि (Leo Zodiac)

सूर्य देवाचे राशिपरिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देणारे ठरू शकतात. कारण सूर्य देव या राशीच्या पंचम भावमध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे या लोकांना या दरम्यान अपत्यासंबंधित शुभ वार्ता मिळू शकते. तसेच यांचे वैयक्तिक आयुष्यसु्द्धा या दरम्यान खूप चांगले ठरेन. हे लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकणार. जर या लोकांचे प्रेम संबंध सुरू असेल तर त्यांना यश मिळू शकते. वेळोवेळी या लोकांना आकस्मिक धनप्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांना पाहिजे त्या उच्च संस्थेमध्ये प्रवेश मिळू शकतो.

हेही वाचा : दिवाळीच्या आधी निर्माण होत आहे गजकेसरी योग! ‘या’ राशींचे नशिब चमकणार, नवीन नोकरीसह मिळू शकतो बक्कळ पैसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे गोचर फायद्याचे ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या चतुर्थ भावमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते. तसेच हे लोक वाहन किंवा संपत्ती खरेदी करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना सूर्याचा गोचर भाग्यवान ठरेल आणि त्यांना मोठ्या यात्रेवर जावं लागेल. तसेच आईबरोबर या लोकांचे संबंध आणखी दृढ होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)