Surya Grahan 2025: वैदिक ज्योतिषानुसार सूर्य आणि चंद्र यांचे ग्रहण वेळोवेळी लागतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देश-विदेशावर दिसतो. २१ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण आश्विन अमावस्येला कन्या राशीत आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात लागेल.

त्या वेळी सूर्य, चंद्र आणि बुध हे तिघेही कन्या राशीत असतील आणि मीन राशीत असलेले शनी देव त्यांच्यावर पूर्ण दृष्टि ठेवतील. अशा वेळी काही राशींचे भाग्य उजळू शकते. या राशींना अचानक धनलाभ होऊन प्रगतीची संधी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहेत त्या लकी राशी…

सिंह राशी (Leo Horoscope)

तुमच्यासाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या रोजच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन कमाईचे मार्ग मिळू शकतात. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होण्याचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पैसे साठवण्यात यश मिळेल आणि बचत वाढेल. तसेच अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नशिबाची साथही मिळेल.

तूळ राशी (Libra Horoscope)

सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात कामकाजात प्रगती होऊ शकते. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीची योजना करू शकता. वैयक्तिक जीवनात, वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. ज्युनिअर आणि सिनिअर यांचा पाठिंबा मिळेल. विरोधक शांत झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मानसिक समाधान मिळेल. तरुणांना आपले ध्येय साध्य करणे सोपे होईल. तुमच्या योजना यशस्वी होतील.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

तुमच्यासाठी सूर्यग्रहण सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल. नवीन मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकाल. करिअरमध्येही चांगला फायदा मिळेल. या महिन्यात तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या बोलण्यात सुधारणा दिसेल आणि तुमच्या वाणीने तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रभावित कराल. तसेच या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)