Surya Grahan Timing: या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला झालं आणि आता शेवटच्या सूर्यग्रहणाची वेळ आली आहे. २०२५ मधील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण काही दिवसांत लागणार आहे आणि याचा पाच राशींवर जास्त परिणाम होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांत २ ग्रहण लागणार आहेत. ७ सप्टेंबरला शनीच्या कुंभ राशीत चंद्रग्रहण झाले आहे. आता २१ सप्टेंबरला कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण सर्व १२ राशींवर परिणाम करेल पण काही राशींवर त्याचा जास्त परिणाम होईल.
हे सूर्यग्रहण भारतात दिसेल का? (Surya Grahan Time)
२१ सप्टेंबरला लागणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचा सुतक काळही लागू होणार नाही. पण ज्योतिषानुसार या सूर्यग्रहणाचा परिणाम राशींवर होऊ शकतो. काही राशींना फायदा होईल तर काहींना तोटा.
जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, तरी २०२५चं हे सूर्यग्रहण न्यूझीलंड, फिजी, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसेल.
सूर्यग्रहणाचा राशींवर परिणाम (Surya Grahan 2025 Date)
पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी हे सूर्यग्रहण कन्या राशीत आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. हे सूर्यग्रहण मिथुन, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकते. या लोकांना करिअर, वैयक्तिक जीवन, पैसा, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात. खास करून कन्या राशीच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे कारण हे ग्रहण त्यांच्याच राशीतच लागणार आहे. त्यांनी वाद टाळावा आणि गुंतवणूक करू नये.
२ राशींसाठी ग्रहण शुभ आहे (Surya Grahan Affects on Zodiac Signs)
हे सूर्यग्रहण वृषभ आणि तूळ राशीसाठी शुभ ठरू शकते. या लोकांना धन मिळण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)