Surya-Ketu Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य एका महिन्यात गोचर करणार आहे आणि केतु ग्रह दीड वर्षानंतर गोचर करणार आहे. पण या दरम्यान ते नक्षत्र परिवर्तन करत असतात. या वेळी सूर्य आणि केतु एकाच दिवशी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याचा फायदा राशिचक्रातील काही राशींवर दिसून येईल.
६ जुलै ला सूर्य नक्षत्र गोचर करून पुनर्वसु नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. पुनर्वसु नक्षत्राचे स्वामी गुरू मानले जाते. तसेच केतु नक्षत्र परिवर्तन करून पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार ज्याचे स्वामी ग्रह शुक्र आहे. यामुळे ७ जुलैपासून ३ राशीच्या लोकांना खूप लाभ होऊ शकतो. त्या राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेऊ या.
मेष राशी (Aries Zodiac)
सूर्य केतुच्या नक्षत्र गोचरमुळे मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये लाभ होऊ शकते. या लोकांचा मान सन्मान वाढू शकतो. या लोकांचे इनकम वाढून नवीन सोर्स मिळू शकतात. या लोकांना मेहनतीचे फळ मिळू शकते. तसेच यांना नवीन जॉबची संधी मिळू शकते. हे नक्षत्र गोचर या राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरेन. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य केतुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे करिअरमध्ये यश मिळू शकते. हे नक्षत्र परिवर्तनामुळे या लोकांना धनलाभ होऊ शकतो. दूरवर प्रवास करणाचे योग जुळून येईल. या लोकांचे पूजा आराधना करण्यात मन रमेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी डील मिळू शकते. या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या लोकांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होईल.
कुंभ राशी (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य केतु नक्षत्राचे गोचर जीवनात सकारात्मकता देईल. करिअरमध्ये नवीन टास्क मिळू शकतात. हे लोक चांगले काम करतील आणि यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. हे लोक कोणत्या ट्रिपवर जाऊ शकतात. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतात. सर्व गोष्टी या लोकांच्या मनासारख्या होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)