Surya Ketu Yuti 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य देवाला आत्मविश्वास, मान सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी आणि प्रशासकीय सेवेचा कारक मानले जाते. याशिवाय केतु ग्रहाला अध्यात्म, वैराग्य, मोक्ष, तांत्रिक इत्यादीचा कारक मानले जाते. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकत्र येतात आणि संयोग निर्माण करतात तेव्हा काही राशींना फायदा होऊ शकतो. सूर्य आणि केतुची युती निर्माण झाल्याने काही राशींचा सुवर्ण काळ सुरू होऊ शकतो. तसेच या लोकांना आकस्मिक धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?
वृषभ राशी (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि केतुची युती सकारात्मक ठरू शकते. कारण ही युती या राशीच्या गोचर कुंडलीतून सुख स्थानावर निर्माण होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकतो. हे लोक वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. तसेच या दरम्यान या लोकांना पितृ संपत्ती प्राप्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचा मान सन्मान वाढू शकतो. तसेच क्रिएटिव्ह कामांपासून किंवा नवीन डिल्सपासून चांगला धनलाभ होऊ शकतो.
कर्क राशी (Cancer Zodiac)
सूर्य आणि केतुचा संयोग निर्माण झाल्याने कर्क राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा संयोग या राशीच्या धन आणि वाणी स्थानावर निर्माण होत आहे. त्यामुळे या वेळी या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळा तेज दिसून येईल. या दरम्यान या लोकांचे संवाद कौशल्य आणखी मजबूत होईल, ज्यामुळे लोक आकर्षित होईल. या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो, ज्यामुळे यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. याशिवाय जुन्या गुंतवणुकीतून या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. या वेळी या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
सूर्य आणि केतुच्या युतीने वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण हा संयोग या राशीच्या नवव्या भावात निर्माण होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळेल. तसेच या दरम्यान हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात. तसेच या दरम्यान या लोकांची धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे लोकांना परीक्षेत यश मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून धन लाभ होऊ शकतो. तसेच या वेळी ठरवलेले प्लॅन यशस्वी होऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)