August Surya Ketu Yuti 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देव आत्मविश्वास, मान-सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी, वडील, आणि प्रशासनाशी संबंधित गोष्टींचा कारक मानला जातो. तसेच केतू ग्रह हा अध्यात्म, वैराग्य, मोक्ष, आणि तांत्रिक शक्तींचा कारक असतो. म्हणून जेव्हा सूर्य आणि केतू एकत्र येतात, तेव्हा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो.
ऑगस्टमध्ये बदलणार नशीब (August Horoscope Benefits to Zodiac Signs)
यावर्षी ऑगस्ट महिन्यात सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती होणार आहे. ही युती जवळपास १८ वर्षांनी होत आहे, त्यामुळे काही राशींच्या नशिबात चांगला बदल होऊ शकतो. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून प्रगतीचे योग देखील निर्माण होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशी सध्या लकी ठरणार आहेत.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
तुमच्यासाठी सूर्य आणि केतूची युती अनुकूल ठरू शकते. कारण हा संयोग तुमच्या राशीपासून सुख स्थानात होणार आहे.या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.
तुम्ही एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. या काळात पितृ संपत्तीपासूनही लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना अचानक पैसा मिळू शकतो, जसे की वारसा, विमा किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा. प्रेमसंबंधात भावनिक अनुभव होतील आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल. आईसोबतचे संबंध चांगले राहतील.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
सूर्य आणि केतू यांचा संयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. कारण हा संयोग त्यांच्या गोचर कुंडलीतील भाग्य स्थानात होणार आहे. त्यामुळे या काळात त्यांना नशिबाची साथ मिळू शकते. याच काळात ते कामकाज किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकतात.
धर्म आणि पूजापाठ यामध्ये त्यांची आवड वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये मान-सन्मान आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनातही आनंददायक अनुभव मिळू शकतात.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि केतूची युती शुभ फळ देणारी ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीपासून अष्टम भावात होणार आहे. या काळात तुमच्यात आत्मविश्वास वाढलेला दिसेल. जे लोक संशोधन (रिसर्च) क्षेत्रात आहेत, त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि भागीदारीतील व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. कायदेशीर प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन यश मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि नोकरीत पगारवाढ होऊ शकते.