Ketu Surya Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत युती करतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर आणि देश-विदेशावर थेट होतो.
१७ सप्टेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीत गेला आहे, जिथे आधीच केतु ग्रह आहे. त्यामुळे १८ वर्षांनी पुन्हा सूर्य आणि केतू युती सिंह राशीत झाली आहे, जी शुभ मानली जात नाही. या काळात ३ राशींच्या लोकांनी थोडं सावध राहावं, कारण धनहानी आणि तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. चला, तर मग पाहूया या राशी कोणत्या आहेत…
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
तुमच्यासाठी केतू आणि सूर्याची युती प्रतिकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या वैवाहिक जीवन आणि भागीदारीच्या स्थानावर होत आहे. त्यामुळे विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव येऊ शकतो. या काळात भागीदारीत नवीन काम सुरू करण्याचे टाळा. तसेच कुटुंबातील लोकांसोबत काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. या काळात हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतो किंवा ज्यांना आधीपासून हृदयाचा त्रास आहे त्यांनी जपून राहावे.
सिंह राशी (Leo Horoscope)
केतू आणि सूर्याची युती सिंह राशीच्या लोकांसाठी नुकसानदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या पहिल्या भावात होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमच्या मान-सन्मानात घट होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करण्याचा विचार असेल तर तो आत्तासाठी टाळा, कारण प्रवासात अपघात होऊ शकतो. तसेच या काळात कोणाला पैसे उधार देणे टाळा.
मीन राशी (Pisces Horoscope)
तुमच्यासाठी केतू आणि सूर्याची युती हानिकारक ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानावर होणार आहे.या काळात कोर्ट-कचेरीच्या कामांत पराभव होऊ शकतो आणि काही गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. तसेच पोट आणि हृदयाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन सावधगिरीने चालवा, कारण अपघाताची शक्यता आहे. त्याशिवाय तुमच्यावर शनीची साडेसाती सुरू आहे, त्यामुळे जपून राहणे गरजेचे आहे.