Surya Mahadasha: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला वडील, मान-सन्मान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि सरकारी नोकरी, प्रशासन यांचे कारक मानले जाते. सूर्यदेव साधारणपणे ३० दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सिंह राशीवर सूर्यदेवाचे आधिपत्य असते. मेष राशीत सूर्यदेव उच्च असतात, तर तूळ राशीत नीच असतात.

सूर्यदेवाच्या महादशेचा प्रभाव व्यक्तीवर ०६ वर्षे राहतो. ही दशा शुभ की अशुभ असेल, हे कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती कशी आहे यावर अवलंबून असते. जर सूर्य ग्रह शुभ म्हणजे उच्च असेल तर त्या काळात व्यक्तीला मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा मिळते, तसेच सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते.

जर सूर्यदेवाची स्थिती अशुभ असेल, तर सूर्याच्या महादशेत वडिलांशी संबंध बिघडतात. तसेच व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. त्याला मान-सन्मान मिळत नाही. आता पाहूया सूर्यदेवाच्या महादशेत कोणत्या राशींचे नशिब उजळते…

कुंडलीत सूर्यदेव शुभ स्थितीत असतील तर

वैदिक ज्योतिषानुसार, जर सूर्यदेव जन्मकुंडलीत शुभ स्थितीत असतील तर व्यक्तीला शुभ फळ मिळते. तो लोकप्रिय होतो. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. समाजात त्याची वेगळी ओळख तयार होते आणि लोक त्याचे म्हणणे मानतात. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतात. सरकारी कामांशी संबंधित असेल तर चांगला फायदा होतो. वडिलांशी संबंध चांगले राहतात आणि पितृसंपत्तीचा लाभ मिळतो.

सूर्यदेव जन्मकुंडलीत अशुभ स्थितीत असतील तर

ज्योतिषानुसार, जर कुणाच्या कुंडलीत सूर्य ग्रह अशुभ स्थितीत असेल तर तो व्यक्ती थोडा स्वाभिमानी आणि अहंकारी असतो. वडिलांशी त्याचे संबंध चांगले राहत नाहीत. जन्मपत्रिकेत सूर्य नीच किंवा अशुभ असेल तर त्या व्यक्तीला हृदय आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात. सूर्य नीच स्थितीत असेल आणि त्याचा संबंध चतुर्थ भावाशी असेल तर मृत्यू हृदयविकाराने होऊ शकतो. गुरु ग्रहापासून पीडा असेल तर उच्च रक्तदाबाची तक्रार होते. तसेच व्यक्तीला मान-सन्मान मिळत नाही.