Surya – Mangal Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्प बदल करत असतात. यावेळी त्यांची मित्र आणि शत्रू ग्रहांशी युती, गोचर होत असतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावरही होतो. ऑक्टोबरमध्ये मंगळ आणि सूर्याची युती होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या नशीबी अच्छे दिन येऊ शकतात. त्यांच्या उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पण या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत याविषयी जाणून घेऊ….

धनु

मंगळ आणि सूर्याची युती धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासह तुमचा चांगला वेळ जाईल. अनेक आनंदाचे क्षण अनुभवू शकता.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि सूर्याची युती सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. बुद्धीच्या जोरावर तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी मिळवता येऊ शकते. लव्ह लाइफमध्ये रोमान्स आणि उत्साह वाढेल. अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते.

कुंभ

मंगळ आणि सूर्याची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात वेळोवेळी तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. तुम्ही यावेळी धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. नवीन लोकांशी मैत्री होईल आणि तुम्हाला सोशल नेटवर्किंगचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्न वाढ आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिक यावेळी मोठा डील मिळू शकते.