Surya Nakshatra Parivartan 2025: हिंदू पंचांगानुसार, हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमादेखील म्हटले जाते. यंदा १२ मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा पौर्णिमेचा दिवस खूप खास मानला जात आहे. कारण, या दिवशी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनही होणार आहे. पंचांगानुसार, ११ मे २०२५ रोजी सूर्य कृतिका नक्षत्रामध्ये प्रवेश करील. ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.

सूर्य करणार ‘या’ तीन राशींना मालामाल

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या संपत्ती आणि सन्मानात वाढ होईल. व्यवसायात हवे तसे यश मिळेल. नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच काहींना सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अडकलेला पैसा परत मिळेल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठीही सूर्याचे नक्षत्र परिवर्तन लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

कर्क (Kark Rashi)

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीसाठी लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीला सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)