Shani Surya Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार २३ ऑगस्ट रोजी सूर्य-शनीचा धोकादायक षडाष्टक योग होणार आहे. याचा परिणाम काही राशींवर जास्त नकारात्मक होईल. या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया या ५ राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यावर षडाष्टक योगाचा नकारात्मक परिणाम होईल.
कर्क राशी (Cancer Horoscope)
सूर्य-शनीचा धोकादायक षडाष्टक योग कर्क राशीसाठी नुकसानकारक मानला जातो. या योगामुळे कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नोकरीत अडथळे आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय घाईने घेणे टाळावे.
सिंह राशी (Leo Horoscope)
सूर्य-शनीचा षडाष्टक योग सिंह राशीसाठी अनुकूल नाही. या धोकादायक योगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. घरातील वातावरणात एकोपा ठेवणे कठीण होईल. पैशांची कमतरता वाढू शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी हा योग शत्रूंना सक्रिय करू शकतो. ऑफिसमध्ये राजकारण, मान कमी होणे आणि आर्थिक तोट्याची शक्यता आहे. या काळात काळजी आणि संयम गरजेचा आहे. तसेच पैशांबाबत आणि आरोग्याबाबतही खूप सतर्क राहावे लागेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
सूर्य-शनीचा हा षडाष्टक योग धनु राशीसाठी खूप अशुभ आणि नुकसानकारक आहे. या योगामुळे धनु राशीच्या लोकांना वाद, खर्चात अचानक वाढ आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक वाद टाळा आणि बोलताना संयम ठेवा.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
सूर्य-शनीचा षडाष्टक योग कुंभ राशीवर नकारात्मक परिणाम करू शकतो. या योगामुळे वाद-विवाद, दुखापत किंवा अचानक एखादी अनपेक्षित अडचण येऊ शकते. सावध राहणे आणि संयम ठेवणे खूप गरजेचे आहे.