Swapan Shastra : झोपेत अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात. स्वप्न पडण्यामागे काही ना काही अर्थ नक्की असतो. पण हे गरजेचे नाही की, तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाचा खऱ्या आयुष्यातही तोच अर्थ असेल. स्वप्नात अनेकदा खूप पैसा, सोन्या-चांदीचे दागिने आपण पाहतो. पण, स्वप्नात या गोष्टी दिसणे शुभ आहे की अशुभ याबाबतचे वर्णन स्वप्नशास्त्रात आढळते. खऱ्या आयुष्यात याचा काय परिणाम होतो याबाबत जाणून घेऊ..

स्वप्नात सोन्या-चांदीचे दागिने दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात सोने किंवा चांदीची वस्तू दिसली तर ते संमिश्र चिन्ह आहे. याचा अर्थ येत्या काही दिवसांत तुम्हाला अशुभ बातमी मिळू शकते, तसेच लवकरच तुमचा खर्च वाढू शकतो. हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की, एकतर तुमच्या कुटुंबात लग्न होऊ शकते किंवा तुम्ही एखाद्या योजनेत खूप पैसे खर्च करू शकता.

हेही वाचा – बुध ग्रहाची उलटी चाल, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना करेल श्रीमंत! नोकरी व्यवसायात मिळेल यश अन् बक्कळ पैसा

स्वप्नात दागिने चोरीला जाताना दिसणे

स्वप्न शास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात तुमचे दागिने चोरीला जाताना दिसले, तर हे एक वाईट लक्षण आहे. याचा अर्थ आगामी काळात तुमचा एखादा विरोधक तुमचे नुकसान करू शकतो. काही गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही स्वतःला तुमच्या स्वप्नात दागिने खरेदी करताना दिसले, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे.

स्वप्नात सोन्याची नाणी दिसणे

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात सोन्याची नाणी दिसली किंवा ती वाजताना दिसली तर ते अशुभ चिन्ह आहे. तसेच अशा स्वप्नांचा अर्थ असा आहे की, येणारा काळ तुमच्यासाठी खूप त्रासदायक असू शकतो. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्याचबरोबर काही कामे पूर्ण होणे थांबू शकते. पैसा तिथेच थांबू शकतो.

स्वप्नात पैसे दिसणे

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात कोणाकडून पैसे घेतले तर ते खूप शुभ चिन्ह आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होऊ शकतो. याशिवाय अशी स्वप्ने तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतात. तसेच कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच तुमची काही महत्त्वाची कामे होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)