आगामी २०२६ हे वर्ष खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. कारण या वर्षात सूर्य आणि चंद्र यांची एकूण चार ग्रहणं लागणार असून त्यातील दोन ग्रहणं थेट होळी आणि सावन यांसारख्या प्रमुख हिंदू सणांच्या काळात येणार आहेत. त्यामुळे या ग्रहणांना धार्मिक आणि ज्योतिषीय दोन्ही स्तरांवर मोठं महत्त्व लाभणार आहे.

फेब्रुवारीत सूर्यग्रहण, मार्चमध्ये होळीच्या दिवशी चंद्रग्रहण

हिंदू पंचांगानुसार, २०२६ वर्षाची सुरुवातच दोन मोठ्या ग्रहणांनी होणार आहे. पहिलं ग्रहण सूर्यग्रहणाचं असून ते १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन मासाच्या कृष्णपक्षातील अमावास्या तिथीला लागेल. हे ग्रहण दक्षिण अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांत दिसणार आहे. मात्र भारतातून हे ग्रहण दृश्यमान होणार नाही.

यानंतर दुसरं ग्रहण म्हणजे ३ मार्च २०२६ रोजीचं चंद्रग्रहण. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या सणाच्या दिवशीच हे चंद्रग्रहण लागणार आहे. हा योग अत्यंत दुर्मीळ मानला जातो. हा आंशिक चंद्रग्रहण भारतातही दिसणार असून खगोलतज्ज्ञ आणि ज्योतिषी या घटनेकडे विशेष लक्ष देत आहेत.

श्रावण पोर्णिमाला लागणार वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण

पहिल्या दोन ग्रहणांनंतर वर्षाच्या उत्तरार्धात आणखी दोन ग्रहणं येणार आहेत. त्यातील २८ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण पोर्णिमाच्या दिवशी वर्षातील शेवटचं आंशिक चंद्रग्रहण लागेल. हे ग्रहण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि पूर्व प्रशांत महासागराच्या काही भागांतून दिसणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज

खगोलतज्ज्ञांच्या मते, २०२६ मध्ये येणारी ही चार ग्रहणं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. सूर्य आणि चंद्र या दोन्ही खगोलीय शरीरांच्या हालचालींमुळे निर्माण होणारे हे संयोग अनेक शतकांतून एकदाच घडतात. विशेषतः होळी आणि सावनसारख्या धार्मिक पर्वांच्या काळात ग्रहण लागल्याने या दिवसांचं धार्मिक महत्त्व अधिक वाढणार आहे.

ज्योतिषीय दृष्टीने प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात देवतांची उपासना, दान-धर्म, ध्यान किंवा जप केल्यास त्याचे पुण्य अधिक लाभदायी ठरते. मात्र ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन, झोप, आणि काही धार्मिक विधी टाळावेत असं शास्त्र सांगतं. यावर्षी होळी आणि श्रावण या दोन्ही पर्वांच्या काळात ग्रहण येत असल्याने, श्रद्धाळू भक्तांसाठी तो काळ अत्यंत सावधगिरीचा आणि अध्यात्मिक दृष्टीनं फलदायी मानला जातो.

संपूर्ण ग्रहण कॅलेंडर २०२६

प्रकार तारीख
दिवस दृश्यता
सूर्यग्रहण
१७ फेब्रुवारी २०२६ मंगळवार भारतात दिसणार नाही
चंद्रग्रहण ३ मार्च २०२६
मंगळवार (होळी) भारतात दिसणार
चंद्रग्रहण
२८ ऑगस्ट २०२६ शुक्रवार (श्रावण पोर्णिमा) काही भागांत दिसणार
सूर्यग्रहण वर्षअखेरीस (संभाव्य नोव्हेंबर)) – मर्यादित क्षेत्रात

हिंदू पंचांग, खगोलशास्त्र आणि श्रद्धा – या तिन्हींचा संगम २०२६ मध्ये एकत्र येणार आहे. त्यामुळे हे वर्ष धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टीनंही खूपच लक्षवेधी ठरणार आहे.