गरुड पुराणाला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये जीवन-मृत्यू व्यतिरिक्त सुखी-यशस्वी जीवन मिळविण्याचे मार्गही सांगण्यात आले आहेत. यासोबतच काही कामे टाळण्यास सांगितले आहे. ही कामे किंवा वाईट सवयी माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे या सवयींपासून वेळीच अंतर ठेवा अन्यथा तुम्हाला याचा फटका सहन करावा लागू शकतो. या चुका माणसाला गरीब बनवू शकतात, त्याचे सर्व सुख हिरावून घेऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • घाणेरडे कपडे घालणे

गरुड पुराणानुसार, देवी लक्ष्मी फक्त अशा लोकांनाच आशीर्वाद देते जे स्वच्छ राहतात. ज्याचे कपडे आणि नखे स्वच्छ असतात आणि जे दररोज अंघोळ करतात. घाणेरड्या लोकांवर लक्ष्मी कधीच दया करत नाही. असे लोक गरिबीने ग्रासलेले असतात.

  • स्वयंपाकघरात उष्टी आणि खरकटी भांडी ठेवणे

रात्री किचन अस्वच्छ ठेवल्याने, किचनमध्ये घाण भांडी सोडल्याने देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी नाराज होतात. अशा घरात कधीच समृद्धी येत नाही आणि त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ करावे.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

  • खूप वेळ झोपून राहणे

ज्या घरांमध्ये लोक जास्त वेळ झोपतात त्या घरांवर लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही. हे लोक ना आयुष्यात प्रगती करतात आणि ना त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही.

  • असहायांचे शोषण करणारे लोक

जे लोक असहाय लोकांचे शोषण करतात, इतरांचे हक्क हिसकावून घेतात, फसवणूक करून एखाद्याची संपत्ती बळकावतात, असे लोक काही काळ श्रीमंत झाले तरी लवकरच सर्वस्व गमावतात. म्हणून ही वाईट कृत्ये कधीही करू नये.

  • महिला-वृद्धांचा अपमान करणे

जे महिला-वृद्धांचा अपमान करतात, दुबळ्या लोकांसोबत गैरकृत्य करतात, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळतो. त्यांची संपत्ती आणि प्रतिष्ठा नष्ट होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि समान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These mistakes can make you poor reason is said in garuda purana pvp
First published on: 10-06-2022 at 16:23 IST