एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा मूलांक ४ असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु काही लोकांसाठी मात्र हा आठवडा चिंता आणि शारीरिक वेदना देणारा ठरू शकतो. आज आपण जाणून घेऊया, सर्व मूलांकांच्या जातकांसाठी पुढील आठवडा कसा असेल.
मूलांक १ :
मूलांक १ असणाऱ्या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये भाग्याची साथ मिळेल. खर्चांमध्ये वाढ आणि कार्यक्षेत्रात अडचणी आल्यामुळे मन चिंताग्रस्त राहील. भावनात्मक समस्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडू शकतात. या आठवड्यात घरामध्ये कोणतेही परिवर्तन करणे टाळावे.
शुभ रंग : केसरी. शुभ अंक : ३
मूलांक २ :
मूलांक २ असणाऱ्या लोकांना कार्यक्षेत्रामध्ये धनलाभ होण्याच्या शक्यता आहेत. हे लोक वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील, परंतु आईच्या समस्यांमुळे चिंतीतही राहतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही रक्तदाब आणि पोटाच्या संबंधी तक्रारींमुळे त्रासलेले असू शकता.
शुभ रंग : खाकी/तपकिरी, शुभ अंक : ५
करिअर-व्यवसायातील प्रगतीशील ग्रहाने बदलला मार्ग; जाणून घ्या तुमच्या राशीसाठी आहे शुभ की अशुभ
मूलांक ३ :
मूलांक ३ असणाऱ्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये भाग्याची साथ मिळेल. तुमच्या पूर्वप्रयत्नांचा लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. मात्र मुलांसंबंधी चिंता असेल. विजेच्या संबंधी कामे करताना सावध राहावे.
शुभ रंग : केसरी, शुभ अंक : ५
मूलांक ४ :
मूलांक ४ असणारे लोक आपल्या प्रयत्नांमुळे आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे सतत नकारात्मक विचार मनात येतील. या आठवड्यात तुमच्या योजना शेवटच्या क्षणी प्रलंबित राहणार असल्याचे दिसते. कफजन्य रोग तुम्हाला त्रास देतील, त्यामुळे काळजी घ्या.
शुभ रंग : नेव्ही ब्लू, शुभ अंक : १
तुळशीच्या शेजारी चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; फायद्याच्या जागी होऊ शकते मोठे नुकसान
मूलांक ५ :
मूलांक ५ असणाऱ्या लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी विशेष आनंदाची बातमी मिळेल. व्यावसायिक सहलींमधून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल, परंतु कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे योग्य राहील.
शुभ रंग : नेव्ही ब्लू, शुभ अंक : १
मूलांक ६ :
मूलांक ६ असणाऱ्या लोकांना या आठवड्यात आर्थिक लाभ हळूहळू प्राप्त होतील. प्रवासातून विशेष लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबातील कोणत्याही समस्येमुळे तुम्ही चिंतेत राहाल. या आठवड्यात मन शांत ठेवा आणि हृदयविकारांपासून सावध राहा.
शुभ रंग : फिकट जांभळा, शुभ अंक : ३
तुळशीची सुकलेली पाने चमकावणार नशीब; जाणून घ्या कसा करावा वापर
मूलांक ७ :
मूलांक ७ असणाऱ्या लोकांनी या आथंडाव्यात कामाच्या वरती संयम बाळगावा. या काळात तुमच्या कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रवासात विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी काही चांगल्या बातम्या मिळतील.
शुभ रंग : गुलाबी, शुभ अंक : २
मूलांक ८ :
मूलांक ८ असणारे लोक अडकलेल्या कामांमुळे चिंतेत राहतील. परंतु तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. या आठवड्यात तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल. प्रवास करताना सावध राहा.
शुभ रंग : फिकट जांभळा, शुभ अंक : ३
मूलांक ९ :
मूलांक ९ असणाऱ्या लोकांना या आठवड्यात कामात नेहमीपेक्षा जास्त संघर्ष होईल. प्रेमप्रकरणात हळूहळू वाढ झाली तर यश मिळेल. पालकांकडून काही चांगली बातमी मिळेल. अपघात किंवा वाहन चोरीची शक्यता आहे, काळजी घ्या.
शुभ रंग : फिकट लाल, शुभ अंक : १
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)