ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र देखील माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती देते. ज्योतिष शास्त्र व्यक्तीच्या राशीच्या आधारावर याची गणना करते. तर, सामुद्रिक शास्त्र व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचा आकार, रंग, शरीराच्या खुणा इत्यादींच्या आधारे ही गणना करते. प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना वेगळी असते आणि त्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य अवलंबून असते.

आज आपण अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या गालावर खळी आहे. मुलींच्या गालावर पडणारी खळी त्यांच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडते. पण सामुद्रिक शास्त्रात याच्या आधारेच व्यक्तीचे भविष्य, त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येते. गालांच्या रचनेच्या आधारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेऊया.

हाताला सहा बोटं असणाऱ्या व्यक्ती असतात खूपच भाग्यशाली; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय म्हणतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या मुलींच्या गालावर खळी असते, त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेत चांगली असते. या मुलींना आयुष्यात खूप आनंद मिळतो. त्यांना कधीही पैशांची चणचण भासत नाही. त्या मोकळ्या हाताने खर्च करतात. तसेच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते.
  • गालावर काळे तीळ असणाऱ्या मुलींना खूप भाग्यवान समजले जाते. त्या जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवतात. त्याचबरोबर पुरुषांच्या गालावर काळे तीळ असणे शुभ नाही. सामुद्रिक शास्त्रात हे अशुभ मानले जाते.
  • सामुद्रिक शास्त्रानुसार गुलाबी आणि फुगलेले गाल असणारे लोकही भाग्यवान असतात. ते आनंदी जीवन जगतात. हे लोक जे काही काम करतात त्यात यश मिळवतात. तसेच हे लोक घेतलेले काम पूर्ण करूनच दाखवतात.
  • ज्या लोकांचे गाल फुगलेले नसतात, अशा लोकांबद्दल म्हटले जाते की या लोकांना कौटुंबिक सुख मिळत नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)