ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी परिवर्तन होतं किंवा वक्री होते, त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर झालेला दिसतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. ज्यामध्ये प्रथम सूर्य देव १७ सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर १० सप्टेंबरला बुध ग्रह वक्री होईल. दुसरीकडे, 24 सप्टेंबरला शुक्र कन्या राशीत येऊन सूर्यदेवाची भेट घेईल. या ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु अशा ४ राशी आहेत ज्यांनी या काळात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

सिंह : सप्टेंबर महिन्यात तुम्ही थोडे सावध राहावे. यावेळी व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करावी. यावेळी नवीन व्यवसाय सुरू करू नका. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काही समस्या येऊ शकतात. तसेच, कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा पैसे बुडू शकतात.

तूळ : सप्टेंबरमध्ये ग्रहांची बदलती स्थिती तुमच्यासाठी थोडी त्रासदायक ठरू शकते. यावेळी घरगुती कलह होऊ शकतो. कार्यालयात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. या महिन्यात अनावश्यक खर्च होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. व्यवसायात हळूहळू यश मिळू शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti: कितीही प्रेम केले तरी पत्नी ‘या’ ५ गोष्टी लपवतात, ऐकून चकित व्हाल!

वृश्चिक : तुमच्यासाठी सप्टेंबर महिना आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने ग्रहांच्या बदलत्या स्थितीत थोडासा चिंताजनक असू शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी किंवा व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर आता थांबा. कोणालाही कर्ज देऊ नका. नवीन व्यवसायही सुरू करू नका. यावेळी तुमचे काही महत्त्वाचे काम अडकू शकते. यावेळी कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत उत्तेजित होऊ नका आणि कामात निष्काळजी राहू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु: सप्टेंबर महिना तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. व्यवसायात कमी फायदा होऊ शकतो. तसेच, यावेळी तुम्हाला गुप्त शत्रूंकडून त्रास होऊ शकतो. तसेच कार्यालयातील वाद टाळा. प्रतिष्ठा कमी होऊ शकते. तसेच लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. लोकांना कौटुंबिक जीवनातही अडचणी येऊ शकतात. या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांशी असहमत होऊ शकता.

(टीप- इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)