Trigrahi Yog In Mithun 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करुन त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. अशातच आता मिथुन राशीमध्ये गुरु, सूर्य आणि बुध यांच्या युतीने त्रिग्रही योग निर्माण होतोय. हा शुभ योग ‘मे’ च्या शेवटी घडून येणार आहे. शास्त्रामध्ये त्रिग्रही योग अत्यंत दुर्मिळ मानला गेला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना या त्रिग्रही योगाचा शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात.
त्रिग्रही राजयोग; ‘या’ राशींना मिळणार पद-पैसा-लाभ!
मिथुन
त्रिग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरु शकतो. हा शुभ योग तुमच्याच राशीत घडून आला आहे. या काळात नशीबही तुमच्या बाजूने असेल. या काळात तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिक लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रात फायदे मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. या काळात सुख-सोयी आणि सुविधा वाढू शकतात.
कन्या
त्रिग्रही योग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. अनेक नवीन संधी मिळू शकतात. शिक्षण क्षेत्रातही फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. समाजात तुमची मान उंचावलेली असेल. तुम्ही जर कुठे पूर्वी गुंतवणूक केली असेल तर त्यातून देखील मोठा लाभ मिळू शकतो. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात भौतिक सुख अनुभवू शकाल.
धनू
त्रिग्रही योग धनू राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची अपार प्रगती होऊ शकते. संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. नोकरीसाठी ठिकाण बदलावे लागू शकते. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी होईल आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)