Trigrahi Yog: दृक पंचांगानुसार, वक्री मार्गाने बुध वृश्चिक राशीत ६ डिसेंबर २०२५ला गोचर करणार आहे. या दिवशी रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी हे गोचर होईल. २९ डिसेंबरला सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी बुध धनु राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीत चंद्र १७ डिसेंबर २०२५ बुधवारी सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी प्रवेश करेल आणि मग १९ डिसेंबर २०२५ रोजी धनु राशीत प्रवेश करेल.

सूर्य वृश्चिक राशीत त्रिग्रही योग

सूर्य वृश्चिक राशीत १६ नोव्हेंबर २०२५ला दुपारी१ वाजून ४४ मिनिटांनी प्रवेश करेल आणि १६ डिसेंबर सकाळी ४ वाजून २६ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे १७ डिसेंबर २०२५ पासून चंद्र धनु राशीत प्रवेश करेपर्यंत मंगळाच्या वृश्चिक राशीत सूर्य चंद्र आणि बुधाचा त्रिग्रही योग निर्माण होत आहे. या त्रिग्रही योगामुळे तीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. त्यांची बुद्धी वाढेल, यश मिळेल आणि मन शांत राहील. तर जाणून घेऊ या तीन राशी कोणत्या आहेत…

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग सकारात्मक परिणाम देऊ शकतो. लाभाचे अनेक मार्ग खुले होतील, ज्यामुळे या राशीच्या लोकांना धन लाभ होऊ शकतो. यांना त्यांच्या बेटर हाफची पूर्णपणे साथ मिळेल आणि मुलांकडूनही आनंदी वार्ता मिळू शकतात. या राशीच्या लोकांच्या सन्मानात वाढ होईल. नवीन व्यापार सुरू करण्यासाठी किंवा नोकरी बदलण्यासाठी हा शुभ काळ सिद्ध होऊ शकतो.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. त्यांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते आणि कामाच्या ठिकाणी त्यांना अधिक सन्मान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. मोठा नफा कमवू शकतात. एखाद्या मोठ्या संपत्तीची खरेदीही करू शकता. कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची पूर्ण साथ लाभेल.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठीदेखील हा त्रिग्रही योग शुभ ठरणारा आहे. कामाच्या ठिकाणी या लोकांचं भाग्य पूर्णपणे त्यांच्यासोबत असेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यात यशस्वी ठरतील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम पूर्ण होईल. कौटुंबिक जीवनात सकारात्मकता वाढेल. व्यवसाय आणि नोकरीसंबंधित अडचणी संपून जातील.