Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे १२ राशींच्या नशिबी आज काय असणार आहे त्याचा संपूर्ण आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 09 July 2025 : आजचे राशिभविष्य ०९ जुलै २०२५

17:54 (IST) 9 Jul 2025

Numerology : नोकरी नाही व्यवसायात बक्कळ पैसा कमावतात 'या' तारखेला जन्मलेले लोक; अफाट संपत्ती अन् मालमत्तेचे असतात मालक

Numerology : अंकशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचा खालील तारखेला जन्मलेल्या लोकांवर विशेष प्रभाव असतो. या संख्येशी संबंधित लोक रोमँटिक आणि आकर्षक असतात. ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 9 Jul 2025

शनीची साडेसातीही देईल लक्ष्मीकृपा, पुढील ६ महिने 'या' राशीच्या नशिबाला मिळेल ३६० अंशात कलाटणी

२९ मार्च २०२५ रोजी शनीने मीन राशीत प्रवेश करताच साडेसतीचा पहिला टप्पा देखील सुरू झाला. त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागले. जाणून घ्या, शनीच्या साडेसातीमध्ये पुढील ६ महिने कसे जातील ते जाणून घ्या. ...अधिक वाचा
17:14 (IST) 9 Jul 2025

१०० वर्षांनंतर देवगुरु बृहस्पती युवा अवस्थेत; 'या' राशींसाठी सुरू होईल सुवर्णकाळ; करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता

काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच, या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत... ...अधिक वाचा
14:27 (IST) 9 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

13:57 (IST) 9 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.

13:37 (IST) 9 Jul 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सुस्वभावी लोकांच्यात वावराल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल.

13:07 (IST) 9 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. भुलथापांना भुलून जाऊ नका.

12:39 (IST) 9 Jul 2025

चाणक्यासारखी तीक्ष्ण बुद्धी हवीये? मग त्यांच्या ‘या’ ५ नीती तुमचं आयुष्य बदलू शकतात!

Chanakya Neeti For Intelligence : तुम्हाला पण चाणक्य यांच्या प्रमाणे बुद्धी आणि रणनीतिक विचार हवे असेल तर चाणक्य यांच्या या पाच नीती नेहमी लक्षात ठेवाव्या. ...अधिक वाचा
12:36 (IST) 9 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कामाला गती मिळेल.

12:23 (IST) 9 Jul 2025

१३ जुलैपासून पैसाच पैसा! ३० वर्षानंतर कर्मफळदाता शनी होणार वक्री, 'या' तीन राशीच्या व्यक्तींच्या धन-संपत्तीत होणार घसघशीत वाढ

Saturn Retrograde Effects: सध्या शनी मीन राशीत विराजमान असून १३ जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून तो २८ नोव्हेंबरपर्यंत याच अवस्थेत असेल. ...सविस्तर वाचा
12:15 (IST) 9 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल. मोठ्या ,प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. अचानक धनलाभाची शक्यता.

11:52 (IST) 9 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. बोलक्या व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

11:25 (IST) 9 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

जवळचे मित्र भेटतील. कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

11:20 (IST) 9 Jul 2025

अचानक मिळेल पैसाच पैसा! ५० वर्षानंतर विपरीत राजयोग निर्माण झाल्याने या राशींचे चांगले दिवस येणार, शनीची होईल असीम कृपा

Vipreet Rajyog In Kundli 2025: ज्योतिष्यशास्त्रानुसार,शनी देव ५० वर्षानंतर विपरीत राजयोग निर्माण करत आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. ...अधिक वाचा
11:11 (IST) 9 Jul 2025

सूर्य आणि चंद्र देणार नुसता पैसा; समप्तक राजयोगाचा शुभ प्रभाव 'या' तीन राशींना देणार गडगंज श्रीमंती

Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्र ९ जुलै रोजी सकाळी ३ वाजून १४ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार असून तो ११ जुलैपर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यामुळे जवळपास ५४ तास हा योग असेल. ...वाचा सविस्तर
10:51 (IST) 9 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

लहानशा अपयशाने खचून जाऊ नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

10:26 (IST) 9 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

मनात विचारांचा गोंधळ उडेल. ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.

10:25 (IST) 9 Jul 2025

माता लक्ष्मीच्या 'या' पाच प्रिय राशींना मिळते अपार धनसंपत्ती, पैसा अन् लोकप्रियता, कधीही पैशांची कमतरता भासत नाही

Maa Lakshmi Favorite Zodiac: ज्योतिषशास्त्रानुसार, माता लक्ष्मीच्या या पाच राशीअत्यंत प्रिय आहे आणि या राशींचे लोक असीम धन संपत्ती मिळवतात. ...वाचा सविस्तर
09:58 (IST) 9 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

वेळेचे बंधन पाळावे लागेल. घाई गडबडीत कामे उरकू नका. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. लोक तुमच्या स्वभावाकडे आकृष्ट होतील.

09:34 (IST) 9 Jul 2025

गुरुपौर्णिमेनंतर १२ दिवसांनी 'या' राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? जबरदस्त राजयोग बनवणार धनाढ्य, मिळणार चांगला पैसा!

Lucky Zodiac Signs: लवकरच एक शक्तिशाली व दुर्मिळ राजयोग निर्माण होतोय, जो नवी नोकरी, पदोन्नती, सुख-संपत्ती आणि आकस्मिक धनलाभाचे संकेत देतोय. ...वाचा सविस्तर
09:20 (IST) 9 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. अति विचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

08:53 (IST) 9 Jul 2025

२६ जुलैपासून पैसाच पैसा, शुक्र ग्रह करणार बुधाच्या राशीत प्रवेश; 'या' राशींना मिळणार नवी नोकरी अन् व्यवसायात यश

Shukra Gochar 2025: पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र २६ जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत तो २० ऑगस्टपर्यंत असेल. शुक्राच्या या राशीपरिवर्तनाने काही राशींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. ...सविस्तर वाचा
08:46 (IST) 9 Jul 2025

Daily Horoscope: अपयशाने जाऊ नका खचून, फसवणुकीपासून रहा सावध; आज कोणता सल्ला तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर? वाचा १२ राशींचे राशिभविष्य

Rashi Bhavishya In Marathi, 9 July 2025 : तर बुधवारी तुमच्या आयुष्यात नवं काय घडणार, तुम्हाला कशाची काळजी घ्यावी लागणार जाणून घेऊया… ...वाचा सविस्तर

today horoscope 09 July 2025 live updates in marathi aajche rashi bhavishya today astrology news

(Photo Courtesy-Freepik)