Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १३ जून २०२५

19:14 (IST) 13 Jun 2025

सूर्य, बुध आणि गुरू निर्माण करणार शक्तिशाली ब्रह्म आदित्य योग! या ३ राशींना होईल खूप फायदा! उत्पन्नात अपार वाढ होण्याचे योग

ज्योतिषशास्त्रात, हा योग खूप शुभ आणि शक्तिशाली मानला जातो. अशा परिस्थितीत, हा काळ काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. ...सविस्तर वाचा
17:53 (IST) 13 Jun 2025

न्यायदेवता शनीचा मीन राशीत प्रवेश! सिंह राशीमध्ये शनीची ढैय्या सुरू! २०२७पर्यंत कसा होईल परिणाम? जाणून घ्या...

Saturn Transit 2025 : ३० वर्षांनंतर मीन राशीत आल्याने सिंह राशीला खूप फायदे मिळू शकतात. गुरुच्या घरात शनीचे आगमन सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात खूप परिणाम करणार आहे. ...वाचा सविस्तर
16:30 (IST) 13 Jun 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. स्वत:च मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता. सहकुटुंब प्रवास टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

16:29 (IST) 13 Jun 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. हित शत्रूंचा त्रास संभवतो. अती अट्टाहास करू नका. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.

16:24 (IST) 13 Jun 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. पुढचा मागचा विचार न करता वागू नका. तिखट व तामसी पदार्थ खाल.

16:17 (IST) 13 Jun 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल. मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका. भावंडांचा विरोध सहन करावा लागेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.

16:00 (IST) 13 Jun 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.

15:36 (IST) 13 Jun 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी. चपळाईने कामे तडीस न्याल. मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.

15:29 (IST) 13 Jun 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

काम आणि वेळ यांचा ताळमेळ घालावा. भांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो. तिखट व तामसी पदार्थ खाल. पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.

15:20 (IST) 13 Jun 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.

14:34 (IST) 13 Jun 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

14:14 (IST) 13 Jun 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. यांत्रिक उद्योगातून फायदा संभवतो. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.

13:54 (IST) 13 Jun 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावेत. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.

13:09 (IST) 13 Jun 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.

11:27 (IST) 13 Jun 2025

आजपासून 'या' राशींना नशीबाची साथ मिळत राहणार? ३० वर्षांनंतर शनीच्या अद्भुत योगामुळे जीवनात येणार सुख, संपत्ती अन् यशाची लाट!

Shukra Shani Shubh Yog 2025: शुक्र-शनीचा अद्भूत योग, काही ३ राशींना उत्तम काळ, मोठा लाभ मिळण्याची शक्यता, पाहा तुमची रास आहे का यात? ...अधिक वाचा
11:26 (IST) 13 Jun 2025

शनी-सूर्य निर्माण करणार षोडशपंचाक योग; या तीन राशीच्या व्यक्तींचा सुरू होणार सुवर्णकाळ

Shodash Panchank Yoga: पंचांगानुसार, १२ जून २०२५ रोजी सकाळी १ वाजता सूर्य आणि शनी एकमेकांपासून ८० डिग्रीवर असतील. ...सविस्तर बातमी
11:25 (IST) 13 Jun 2025

शनी-बुधाच्या युतीची कमाल, 'या' तीन राशींचे लोक होणार मालामाल; नवपंचम राजयोग देणार भरपूर यश अन् भरपूर पैसा

Navpancham Rajyog 2025: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवज्यात हे दोन्ही एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. ...सविस्तर बातमी
08:35 (IST) 13 Jun 2025

Daily Horoscope: गुरू आर्द्रा नक्षत्रात येताच कोणत्या राशी होणार प्रचंड श्रीमंत? मान-सन्मानसह आनंद येईल दारी; वाचा राशिभविष्य

Daily Horoscope In Marathi : गुरू आर्द्रा नक्षत्रात येताच कोणत्या राशी होणार प्रचंड श्रीमंत? मान-सन्मानसह आनंद येईल दारी; वाचा राशिभविष्य ...सविस्तर बातमी

Horoscope Today in Marathi 13 june 2025

(Photo Courtesy-Freepik)