Today Horoscope: आज म्हणजे १३ नोव्हेंबर, गुरुवार आहे. या दिवळी गुरु आणि चंद्र कर्क राशीत एकत्र येऊन हंस राजयोग तयार करतील, तर चंद्र सिंह राशीत भ्रमण करताना अनफा योग निर्माण करेल.
आज मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या केंद्र भावात राहून धन योग तयार करतील, तसेच मंगळ स्वतःच्या राशीत असल्याने रुचक योगही बनेल. यासोबतच मघा नक्षत्राच्या संयोगाने ब्रह्म योग आणि ऐंद्र योगही प्रभावी राहतील. या सर्व योगांमुळे आणि भगवान विष्णूच्या कृपेने आजचा दिवस मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी विशेष भाग्यवान ठरणार आहे. चला तर मग पाहूया, कोणत्या राशीचा आज लकी दिवस ठरणार आहे.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि कमाईच्या दृष्टीने चांगला राहील. तुम्हाला नोकरीत तुमच्या योजनेनुसार काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या टीमसोबत चांगला समन्वय ठेवू शकाल, त्यामुळे काम नीट आणि वेळेत पूर्ण होईल.
व्यवसायाच्या दृष्टीनेही आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल.
जर तुम्ही नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर आज काही चांगली बातमी मिळू शकते आणि त्यामुळे तुम्ही आनंदी रहाल. ग्रहस्थिती सांगते की तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीतूनही फायदा होईल. कौटुंबिक आयुष्याच्या दृष्टीनेही आजचा दिवस शांत आणि आनंददायक जाईल.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज गुरुवारचा दिवस भाग्यवान आणि उत्साह वाढवणारा असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. जे लोक उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
सरकारी कामाशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान आणि प्रभाव वाढेल. आर्थिक बाबतीतही आज तुम्हाला अशा ठिकाणाहून फायदा होऊ शकतो, जिथून तुम्हाला अपेक्षा नव्हती. जे लोक वैद्यकीय क्षेत्रात किंवा हॉटेल व्यवसायात आहेत, त्यांची कमाई आज वाढण्याची शक्यता आहे. पितृक संपत्ती किंवा वडिलांकडूनही तुम्हाला काही लाभ मिळू शकतो.
तूळ राशी (Libra Horoscope)
तुला राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन आणि उत्साहवर्धक अनुभव घेऊन येईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि नवीन जबाबदारीही दिली जाऊ शकते.
ग्रह सांगतात की तुम्हाला आज काही मोठी जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी रहाल. घरगुती बाबतीतही आजचा दिवस तुमच्या बाजूने राहील.
प्रेमसंबंधात प्रेम आणि आपुलकी टिकून राहील. तुम्हाला मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून एखादं सरप्राइज गिफ्ट मिळू शकतं. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज किंवा तणाव असेल, तर तोही आज दूर होण्याची शक्यता आहे. तसेच, लहान प्रवासाचा योगही आज तयार होऊ शकतो.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जे लोक आजारी आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. अडकलेली काही कामे आज पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल. शासन किंवा सरकारी संपर्कातूनही तुम्हाला फायदा मिळू शकतो.
ग्रह सांगतात की आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळण्याची खास संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची काही योजना आज थोडी पुढे ढकलली जाऊ शकते, पण त्याचा फायदा तुम्हाला नंतर नक्कीच होईल.
घरातील वडिलधाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुम्ही आज काही नवीन कामाची सुरुवातही करू शकता. वाहन किंवा इतर सुखसोयी मिळाल्याने तुम्ही आनंदी रहाल. ज्यांचे काम परदेशाशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी आज भाग्यवृद्धीचा विशेष योग आहे. कौटुंबिक जीवनातही सुख आणि समाधान अनुभवायला मिळेल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आज गुरुवारीचा दिवस खूप चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना आज यश मिळू शकते.
तुम्हाला वडिलांकडून किंवा पितृक संपत्तीतून काही लाभ मिळू शकतो. ग्रह सांगतात की आज तुम्हाला व्यवसायात नवीन कल्पना किंवा योजना सुचू शकते, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
अल्पकालीन गुंतवणुकीतूनही आज तुम्हाला नफा मिळू शकतो. मालमत्तेशी संबंधित कामांमध्येही यश मिळेल. आजचे भाग्य तुमच्यासाठी काही अनपेक्षित लाभ घेऊन येऊ शकते. विरोधक किंवा शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
