14 August Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीतीद्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आज गुरूवार आहे. तर आज १२ राशींचा दिवस कसा जाणार आहे त्याबद्दल या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊया…

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 14 August 2025 : आजचे राशिभविष्य १४ एप्रिल २०२५

17:36 (IST) 14 Aug 2025

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.

17:32 (IST) 14 Aug 2025

जन्माष्टमीपासून 'या' चार राशींना मिळणार छप्परफाड पैसा; ग्रहांची शुभ स्थिती देणार प्रत्येक कामात यश अन् मोठी पगारवाढ

Janmashtami 2025 Horoscope: ग्रहांची ही स्थिती १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. ...वाचा सविस्तर
16:21 (IST) 14 Aug 2025

श्रीकृष्णाचे लाडके आहेत या राशींचे लोक! भगवान विष्णूची असते विशेष कृपा; आयुष्यभर मिळतो पैसाच पैसा आणि मान-सन्मान!

Shri Krishna's Favourite Zodiac Signs : १२ राशींपैकी काही खास राशी अशा आहेत ज्यांच्यावर श्री कृष्णाची विशेष कृपा असते. ...वाचा सविस्तर
16:20 (IST) 14 Aug 2025

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.

15:58 (IST) 14 Aug 2025

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

14:33 (IST) 14 Aug 2025

दैनिक धनु राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)

रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.

13:03 (IST) 14 Aug 2025

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्राला मदत कराल. प्रिय व्यक्तिला भेटण्याची ओढ वाटेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.

11:58 (IST) 14 Aug 2025

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

आवडी-निवडी वर अधिक खर्च कराल. आवडत्या छंदाला वेळ द्यावा. आजचा दिवस शुभ कारक. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

11:29 (IST) 14 Aug 2025

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

11:12 (IST) 14 Aug 2025

पैसाच पैसा कमावणार! ग्रहांचा राजाचे एकाच दिवशी होणार राशी आणि नक्षत्र परिवर्तन; ३ दिवसानंतर 'या' तीन राशींची होणार चांदी

Surya Gochar Impact: सूर्य आश्लेषा नक्षत्रातून मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. ...अधिक वाचा
11:12 (IST) 14 Aug 2025

पैसाच पैसा कमावणार! ग्रहांचा राजाचे एकाच दिवशी होणार राशी आणि नक्षत्र परिवर्तन; ३ दिवसानंतर 'या' तीन राशींची होणार चांदी

Surya Gochar Impact: सूर्य आश्लेषा नक्षत्रातून मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. ...अधिक वाचा
11:11 (IST) 14 Aug 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका. खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.

10:34 (IST) 14 Aug 2025

महाविस्फोटक योग 'या' ५ राशींवर आणणार संकट! मोठं आर्थिक नुकसान तर भोगावं लागेल भयंकर दुःख, अनपेक्षित अडचण येईल

Shadashtak Yog Bad Impact 2025: जाणून घेऊया या ५ राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यावर षडाष्टक योगाचा नकारात्मक परिणाम होईल ...वाचा सविस्तर
10:13 (IST) 14 Aug 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

संधीचे सोने करायला शिका. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे चीज होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.

09:21 (IST) 14 Aug 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

08:47 (IST) 14 Aug 2025

जन्माष्टमीला ज्वालामुखी योग 'या' ३ राशींच्या आयुष्यात करेल धनाचा स्फोट! शुभ योगामुळे अनपेक्षित धनलाभ अन् मिळेल मोठं यश

Janmashtami 2025 Zodias Signs: या वर्षी जन्माष्टमीला ग्रहांचा असा अद्भुत योग होत आहे, जो या राशींना भरपूर धन देईल. ...वाचा सविस्तर
08:31 (IST) 14 Aug 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

07:56 (IST) 14 Aug 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.

14 august horoscope today

(Photo Courtesy-Freepik)