Aajche Rashi Bhavishya In Marathi 16 September 2025 : आज १६ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. आज परिघ योग जुळून येईल आणि आद्रा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४८ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याचा दुसरा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊया…
१६ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 16 September 2025 )
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा. अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्यांचे चांगले सहकार्य लाभेल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर