Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.

Live Updates

Today Horoscope in Marathi 12 June 2025: आजचे राशिभविष्य १२ जून २०२५

14:00 (IST) 12 Jun 2025

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

13:33 (IST) 12 Jun 2025

सूर्य-चंद्राचा दुर्मिळ संयोग ५ राशींसाठी ठरणार अत्यंत खास! नोकरी-व्यवसायात होईल मोठी प्रगती

ज्योतिषशास्त्रानुसार २२ जून २०२५ला सूर्य-चंद्राची युतीमुळे व्यतिपात योग निर्माण होत आहे. तसे पाहता सूर्य आणि चंद्राचा व्यतिपात योग खूप चांगला मानला जात नाही म्हणजेच या योगामुळे हानिकारक असू शकतो ...अधिक वाचा
12:16 (IST) 12 Jun 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे.

11:43 (IST) 12 Jun 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल. थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.

11:03 (IST) 12 Jun 2025

२२ जूनपासून चमकणार या ३ राशींचे नशीब, व्यापाराचे दाता बुध करणार चंद्राच्या घरात प्रवेश! अचानक धनलाभाचे योग

Mercury Transit 2025 :बुधाच्या गोचर परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. ...वाचा सविस्तर
10:08 (IST) 12 Jun 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

नियोजनबद्ध कामे करावीत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्‍या व्यक्ति तुमच्यावर नाराज होऊ शकतात. प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल.

10:08 (IST) 12 Jun 2025

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील.

09:21 (IST) 12 Jun 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

08:08 (IST) 12 Jun 2025

'या' तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार घसघशीत वाढ; केंद्र त्रिकोण राजयोग देणार सुख-संपत्तीचे सुख

Kendra Tirkon Rajyog: येत्या २९ जून रोजी दैत्यगुरू शुक्र मेष राशीतून आपली स्वराशी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ...वाचा सविस्तर
07:49 (IST) 12 Jun 2025

Daily Horoscope: आज ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी योग तुमच्या राशीला काय देणार? वाचा १२ राशींचे राशिभविष्य

Daily Horoscope in Marathi , 12 June 2025 : कोणत्या राशीवर बसणार पैशांचा पाऊस जाणून घेऊया… ...सविस्तर वाचा

Aajche Rashi Bhavishya Live Updates June 12 2025

आजचे राशिभविष्य १२ जून २०२५