Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Horoscope Today Updates 26 June 2025 : आजचे राशिभविष्य २६ जून २०२५

18:33 (IST) 26 Jun 2025

भगवान जगन्नाथ यांना अत्यंत प्रिय आहेत ४ राशी! सुख-समृद्धीसह मिळतो पैसाच पैसा, ऐशो-आरामाचे आयुष्य जगतात

Favourite Rashiyan Of Lord Jagannath: या वर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा २७ जूनपासून सुरू होत आहे. या रथयात्रेत सहभागी झाल्याने मोक्ष मिळतो. काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर भगवान जगन्नाथ नेहमीच आशीर्वाद देतात. ...वाचा सविस्तर
15:43 (IST) 26 Jun 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

15:42 (IST) 26 Jun 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे.

15:42 (IST) 26 Jun 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

14:16 (IST) 26 Jun 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा.

14:16 (IST) 26 Jun 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

13:18 (IST) 26 Jun 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तम रित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.

13:07 (IST) 26 Jun 2025

Shani Dev's Number : कोणत्या तारखेला जन्मलेले लोक कमावतात खूप पैसा? वाचा, कोणत्या अंकामध्ये लपलेली असते शनिदेवाची ताकद

Shani Dev connection with Mulank 8 : अंकशास्त्रामध्ये, काही विशेष अंकाविषयी सांगितले आहे ज्याचा संबंध शनिदेवाशी असतो. या अंकावर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते आणि जीवनात यांना अपार यश मिळते. आज आपण याच अंकाविषयी जाणून घेणार आहोत. ...अधिक वाचा
12:18 (IST) 26 Jun 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सकस आहार घ्यावा. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

11:04 (IST) 26 Jun 2025

दहा दिवस पैसाच पैसा! बुध ग्रह करणार पुष्य नक्षत्रामध्ये गोचर; 'या' चार राशींना लाभेल अपार श्रीमंती

Budh Nakshatra Gochar 2025 : जाणून घेऊ या पुष्य नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींना चांगले परिणाम दिसून येईल. ...सविस्तर बातमी
09:59 (IST) 26 Jun 2025

Kritika Nakshatra: सूर्याच्या नक्षत्रामध्ये शुक्राचे गोचर! या ३ राशी होतील मालामाल, मिळेल भरपूर प्रेम अन् यश

ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रह भौतिक सुखाचा कारक आहे. काही राशीच्या लोकांना सूर्याच्या कृतिका नक्षत्रात शुक्राच्या प्रवेशामुळे फायदा होईल ...वाचा सविस्तर
09:12 (IST) 26 Jun 2025

३ दिवसानंतर निर्माण होणार महापुरूष राजयोग, 'या' तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार झपाट्याने वाढ

Shukra Gochar In Vrishbha: पंचांगानुसार, शुक्र ग्रह २९ जून रोजी स्वराशी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. हा राजयोग खूप शुभ मानला जातो, त्यामुळे याच्या शुभ प्रभावाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. ...अधिक वाचा
07:46 (IST) 26 Jun 2025

Today's Horoscope: स्वामींच्या कृपेने आजचा दिवस 'या' राशींसाठी शुभ; कोणाला लाभ तर कोणाच्या मनावरील दडपण होईल दूर

Daily Astrology in Marathi : तर स्वामींच्या कृपेने तुमचा गुरुवार कसा जाणार जाणून घेऊ… ...सविस्तर बातमी

आजचे राशिभविष्य २६ जून २०२५