Dainik Rashi Bhavishya Updates : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनिदेवाला जीवन, वेदना, रोग, दुःख, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकरी, तुरुंगावास इत्यादींचे कारण मानले जाते. तसेच शनी देव वेळोवेळी मार्गी होऊन राजयोग आणि शुभ योग तयार करतात. २०२५ च्या शेवटी शनिदेव शनिदेवाचे मार्गी होणार आहेत, ज्यामुळे धनलक्ष्मी राजयोग निर्माण होईल…

Live Updates

Daily horoscope live updates in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १५ जुलै २०२५

19:16 (IST) 15 Jul 2025

३० वर्षानंतर विपरीत राजयोग! शनीच्या कृपेने 'ही' रास होणार प्रचंड मालामाल, फक्त पैसाच नाही तर मनातील सगळ्याच इच्छा होतील पूर्ण

Shani Viprit Rajyog 2025: तुमच्या आयुष्यातील संघर्ष आणि अडचणींमधून आता सुटका मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आणि नोकरीतही लाभ होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
19:15 (IST) 15 Jul 2025

गणपती बाप्पाला 'या' पाच राशींचे लोक खूप आवडतात; बाप्पाच्या कृपेने मिळतो भरपूर पैसा आणि नोकरी, व्यवसायात यश

Lord Ganesh Favorite Zodiac Signs: चला तर मग जाणून घेऊया अशा पाच राशींबद्दल ज्या भगवान गणपतींना आवडतात. ...वाचा सविस्तर
18:45 (IST) 15 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी. क्रोधवृत्तीत वाढ होईल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

18:45 (IST) 15 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

बोलतांना इतरांची मने दुखवू नका. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल.

18:26 (IST) 15 Jul 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे. अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

18:20 (IST) 15 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

आर्थिक गणित जमून येईल. जुनी गुंतवणूक कमी येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल. आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका.

17:34 (IST) 15 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

अचानक आलेल्या संधीचे सोने करावे. कामाच्या विस्ताराचा विचार कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते.

17:00 (IST) 15 Jul 2025

Video : पुण्यापासून फक्त ४० किमीवर असलेले हे सुंदर बनेश्वर मंदिर पाहिले का? व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : पुण्यापासून फक्त ४० किमी अंतरावर हे सुंदर मंदिर आहे. बनेश्वर नावाने हे मंदिर ओळखले जाते. श्री बनेश्वर हे एक पुरातन शिवमंदिर, जे निसर्गाच्या सान्निध्यात वसले आहे. हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. ...अधिक वाचा
16:47 (IST) 15 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो. मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

15:03 (IST) 15 Jul 2025

१२ वर्षांनी गुरूचा उदय! 'या' ३ राशींचं नशीब झळकणार, मिळणार पैसा, पद, प्रतिष्ठा आणि यश

Guru Uday 2025 : गुरू ग्रह जुलै महिन्यात मिथुन राशीमध्ये उदय होणार आहे ज्याचा थेट प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईस. पण तीन अशा राशी आहेत, ज्यांचे नशीब चमकू शकते. तसेच या लोकांना पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. अडकलेले धन परत मिळू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत. ...सविस्तर वाचा
14:25 (IST) 15 Jul 2025

Chanakya Niti : वाईट काळात चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आयुष्यच बदलेल!

Chanakya's Teachings for Tough Times : वाईट काळात आचार्य चाणक्य यांच्या काही नीती फायद्याच्या ठरू शकतात. या नीतींमुळे आयुष्य बदलू शकते. जाणून घेऊ या चाणक्य नीतिच्या या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. ...वाचा सविस्तर
14:12 (IST) 15 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

फार रोखठोक भूमिका घेऊ नका. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. उगाच घुसमट होऊ देऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल.

12:08 (IST) 15 Jul 2025

चंद्राचे नक्षत्र परिवर्तन देणार गडगंज श्रीमंतीचे सुख, 'या' तीन राशींच्या व्यक्तींना पदोपदी मिळणार यश

Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्राने १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी चंद्राने शतभिषा नक्षत्रामधून पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. ...अधिक वाचा
11:04 (IST) 15 Jul 2025

तुमच्या दारात तुळस वाढतच नाही? 'या' दिवशी लावा रोप; 'हा' खास शुभ मुहूर्त चुकवू नका; घरात नांदेल धन, सौख्य आणि समृद्धी!

Tulsi Vastu Tips: तुळशीचं रोप कधी आणि कसं लावावं? जाणून घ्या शुभ दिवस आणि योग्य पद्धत ...सविस्तर बातमी
10:47 (IST) 15 Jul 2025

पुढील २४ तासानंतर 'या' चार राशींची होणार नुसती चांदी; सूर्याचे राशी परिवर्तन देणार गजगंज श्रीमंती अन् पद-प्रतिष्ठेत वाढ

Surya Gochar in kark: पंचागानुसार, सूर्य १६ जुलै २०२५ रोजी रात्री संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ...वाचा सविस्तर
10:30 (IST) 15 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मनातील धैर्य वाढवावे लागेल. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका.

09:31 (IST) 15 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

गुंतवणूक सावधानतेने करावी. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे. महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील.

08:35 (IST) 15 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

07:44 (IST) 15 Jul 2025

Horoscope Today: सौभाग्य योगात तुमचे भाग्य कसे खुलणार? कोण करणार संधीचे सोने तर कोणाच्या प्रयत्नाने गोष्टी होतील साध्य? वाचा राशिभविष्य

Dainik Rashi Bhavishya In Marathi, 15 July 2025: तर मंगळवारी तुमच्या आयुष्यात काय नवे घडणार जाणून घेऊया... ...अधिक वाचा

Daily horoscope live updates in Marathi

Daily horoscope live updates in Marathi