Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार आहोत.
Dainik Rashi Bhavishya live in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १८ जून २०२५
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणिवेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही नवीन वस्तु खरेदी केल्या जातील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अति विचार करू नका.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
शनी गुरूच्या महासंयोगामुळे ३ राशींचे नशीब पलटणार! नोकरी आणि व्यापारामध्ये होईल धन लाभ
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
इतरांवर विसंबून राहू नका. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावी लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.
९ जुलैपासून 'या' ५ राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार देवगुरुच्या उदयानं नोकरी-व्यवसायात मिळणार चिक्कार पैसा?
राहू-चंद्राचा ग्रहण योग ५ राशींसाठी ठरेल वरदान! बंपर लाभ होण्याचे प्रबळ योग
'या' तीन राशींची नुसती चांदी, चंद्राचा मकर राशीतील प्रवेश देणार धनलाभाचे संकेत
वैभवाचा दाता शुक्र निर्माण करणार शक्तिशाली पंचमहापुरुष राजयोग, या ३ राशींच्या नशीबाचे दार उघडणार!
चाणक्य नीतीचं धक्कादायक सत्य! चुकूनही 'या' ३ प्रकारच्या लोकांची मदत करू नका; नाहीतर तुमचं आयुष्यच होईल उद्ध्वस्त!
मालव्य राजयोग बनल्याने २९ जूनपासून 'या' राशी होतील अपार श्रीमंत? प्रेम, पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार एकदम! नशिबात आहे का तुमचं नाव?
Daily Horoscope: कामाचा ताण ते पैशांची अडचण; आज काय केल्याने तुमच्या राशीची संकटातून होईल मुक्ती? वाचा १२ राशींचे भविष्य
आजचे राशिभविष्य लाईव्ह १८ जून २०२५