Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

Daily horoscope live updates in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह २८ मे २०२५

15:25 (IST) 28 May 2025

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )

मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. उत्साहावर पाणी पडू देऊ नका. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक शांतता जपावी लागेल.

14:17 (IST) 28 May 2025

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope )

मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. उष्णतेचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात. जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो.

13:28 (IST) 28 May 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope )

चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. गुरूजनांची भेट होईल. अधिकारी लोकांच्यात वावराल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी केल्या जातील.

11:38 (IST) 28 May 2025

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)

अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. काही नवीन स्वप्ने आकार घेऊ लागतील. पत्नीचा गैरसमज दूर करावा लागेल. लहानांबरोबर मजा मस्ती कराल.

11:21 (IST) 28 May 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope )

मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

11:20 (IST) 28 May 2025

५०० वर्षानंतर गुरूचा उदय आणि शनी होणार वक्री; 'या' तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार अन् बँक बॅलन्सही वाढणार

Shani Vakri 2025: जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून गुरू उदित अवस्थेत जाणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम पाहायला मिळेल. ...सविस्तर वाचा
10:07 (IST) 28 May 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)

तुमची धावपळ वाढू शकते. दिवसभर कामात व्यग्र राहाल. मनातील निराशा दूर सारावी. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो.

09:58 (IST) 28 May 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope )

कौटुंबिक कामातून लाभ होईल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कामात क्षुल्लक अडथळे येऊ शकतात.

09:31 (IST) 28 May 2025

Chanakya Neeti: जगातील सर्वांत शक्तिशाली गोष्ट कोणती आहे माहितीये? 'या' गोष्टींची किंमत जाणणारा होऊ शकतो श्रीमंत

Chanakya Niti: चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी एक गोष्ट सांगितली आहे, जी जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. ...सविस्तर वाचा
08:31 (IST) 28 May 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope )

कामात तुमचा आवेश कामाला येईल. तांत्रिक कामात प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. परोपकाराचा मार्ग अवलंबाल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.

07:32 (IST) 28 May 2025

Today's Horoscope: चंद्र गोचरमुळे १२ राशींपैकी कोणत्या राशीच्या आयुष्यात येणार सुखाचे वळण? कोणाला होणार लाभ? वाचा राशिभविष्य

Horoscope Today in Marathi, 28 May 2025 : तर आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया.. ...सविस्तर वाचा

आजचे राशिभविष्य लाईव्ह २८ मे २०२५

आजचे राशिभविष्य लाईव्ह २८ मे २०२५